सोन्याच्या दरात आली तेजी, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत

दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचा भाव(Gold Prize Today) ९५ रुपयांनी वाढून ४८,०१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील व्यापार सत्रात ते प्रति १० ग्रॅम ४७,९२० रुपये होते. त्याच वेळी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत १५४ रुपयांनी वाढून ७०,९९८ रुपये प्रति किलो झाली.

    रुपयाच्या घसरणीमुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या किमती (Gold Silver Rate) वाढल्या आहेत. दिल्ली सराफा मार्केटमध्ये १० ग्रॅम सोन्याच्या किमतीत ९५ रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली. एक किलो चांदीच्या किमतीत १५४ रुपयांची वाढ झाली. अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे सोन्याला पाठबळ मिळाले.

    दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचा भाव ९५ रुपयांनी वाढून ४८,०१५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील व्यापार सत्रात ते प्रति १० ग्रॅम ४७,९२० रुपये होते.
    त्याच वेळी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत १५४ रुपयांनी वाढून ७०,९९८ रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यापार सत्रात एक किलो चांदी ७०,८४४ रुपयांवर बंद झाली होती. आजच्या व्यापारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ४ पैशांनी घसरून ७२.८७ रुपये प्रति डॉलरवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १,८८२ डॉलर आणि चांदीचा भाव प्रति औंस २७.६७ डॉलर होता.

    कोरोना व्हायरस साथीच्या (COVID-19 Pandemic) दुसर्‍या लाटेमुळे अनिश्चित आर्थिक वातावरणात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. एप्रिलमध्ये गोल्ड सेव्हिंग फंड (Gold Saving Fund) आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) मध्ये ८६४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये गोल्ड फंडात ३,२०० कोटी रुपये गुंतविले गेले, तर गोल्ड ईटीएफमध्ये ६,९०० कोटींपेक्षा जास्त रुपये गुंतविले गेले आहेत.