सर्वोच्च दरावरून 7600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी नवा रेकॉर्ड रचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Coronavirus Pandemic) सोन्याचांदीच्या किंमतीत उसळी आल्याचं पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमती आणखी नवा रेकॉर्ड रचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याचे दर (24 कॅरेट) 796 रुपये प्रति तोळाने वाढले आहेत. तर चांदीचे दर (Silver Price Today) जवळपास 885 रुपयांनी वधारले आहेत. केवळ मे महिन्याबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात सोन्याच्या दरात (Gold Price Today ) 1762 रुपये प्रति इतकी वाढ झाली आहे. तर चांदीमध्ये जबरदस्त वाढ या महिन्यात पाहायला मिळाली. चांदी मे महिन्यात प्रति किलो 3445 रुपयांनी वधारली आहे.