सोन्याच्या भावात मोठी घसरण, पण चांदीत झाली वाढ ; जाणून घ्या किंमत ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीचे भाव प्रति औंस अनुक्रमे 1,859 डॉलर आणि 27.78 डॉलर प्रति औंस होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, अमेरिकन एफओएमसी बैठकीच्या निकालाची प्रतीक्षा व्यापारी आणि गुंतवणूकदार करीत असल्याने सोन्याच्या किंमती चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या.

    नवी दिल्ली : जागतिक ट्रेन्डच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत आज सोन्याच्या किंमती 48 रुपयांनी घसरून 47,814 रुपयांवर आल्या. आधीच्या व्यापारी सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 47,862 रुपयांवर आला होता. याउलट चांदी 340 रुपयांनी वाढून 70,589 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

    आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोने व चांदीचे भाव प्रति औंस अनुक्रमे 1,859 डॉलर आणि 27.78 डॉलर प्रति औंस होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, अमेरिकन एफओएमसी बैठकीच्या निकालाची प्रतीक्षा व्यापारी आणि गुंतवणूकदार करीत असल्याने सोन्याच्या किंमती चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या.

    मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, “डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन यील्डमध्ये कालच्या (मंगळवार) सत्रात घसरणीनंतर सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आणि गुंतवणूकदारांनी अमेरिकन फेडरल रिझर्वकडे बैठकीत होणाऱ्या निर्णयाची वाट पाहत आहे.