सोन्याच्या किंमतीत वाढ, ‘या’ दराने मिळत आहे सोने चांदी ; जाणून घ्या

बुधवारी सकाळच्या कमकुवत मागणीमुळे सट्टेबाजांनी त्यांच्या सौद्यात घट केली. त्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर बुधवारी 15 रुपयांनी घसरले आणि 46,540 रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठी असलेले सोन्याचे भाव 15 रुपयांनी म्हणजे 0.03 टक्क्यांनी घसरून 46,540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

    नवी दिल्ली : सोन्याचा दर पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी, एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने 91 रुपयांच्या वाढीसह उघडले परंतु दुपारी 12 नंतर ते 189 रुपयांनी वधारले. जुलै डिलीव्हरीचा चांदीचा भाव 498 रुपयांनी वाढून 68,633 रुपये प्रतिकिलोवर होता.

    बुधवारी सकाळच्या कमकुवत मागणीमुळे सट्टेबाजांनी त्यांच्या सौद्यात घट केली. त्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर बुधवारी 15 रुपयांनी घसरले आणि 46,540 रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर ऑगस्टमध्ये डिलीव्हरीसाठी असलेले सोन्याचे भाव 15 रुपयांनी म्हणजे 0.03 टक्क्यांनी घसरून 46,540 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

    बाजाराचे विश्लेषक म्हणाले की, व्यापाऱ्यांनी सौद्यांच्या संख्येत घट केल्यामुळे सोन्याच्या वायदा किंमत नुकसान झाले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.39 टक्क्यांनी घसरून 1,756.70 डॉलर प्रति औंस झाले. बुधवारी चांदीचे भाव 116 रुपयांनी वाढून, 68,390 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले.