सोन्याच्या किंमतीत चढ-उतार सुरूच; जाणून घ्या आजचा दर

चेन्नईमध्ये सोन्याची किंमत 120 रुपयांनी घसरली आहे. प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,350 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यासोबतच मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,380 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

    दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईमध्ये आज सोन्याच्या किमतीत चढ -उतार झाल्याचे यला मिळाले. या सोन्याच्या किंमतीतील झालेला चढ -उतार पाहण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. आज दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

    चेन्नईमध्ये सोन्याची किंमत 120 रुपयांनी घसरली आहे. प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,350 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 49,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यासोबतच मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,380 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकाता सारख्या शहरात सोन्याची किंमत 150 रुपयांनी कमी झाली असून 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

    सोन्याच्या किंमती कमी जास्त होण्याची म्हणजेच अस्थिरतेची अनेक कारणे आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील चलन किमतींमध्ये बदल, महागाई, मध्यवर्ती बँकांमध्ये सोन्याचे साठे, मध्यवर्ती बँकांचे व्याजदर, दागिने बाजार, ट्रेड वॉर इत्यादींचा समावेश असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे