सोन्याच्या किमती पुन्हा घसरल्या, सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचे दर?

ध्या सोन्याची किंमत १० ग्रॅमवर ४४,६८० रुपये आहे. मागील वर्षी प्रति १० ग्रॅम ५७००० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा जागतिक बाजारात स्थिरता निर्माण होते. तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात.

    नवी दिल्ली : सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घट झाली आहे. सध्या सोन्याची किंमत १० ग्रॅमवर ४४,६८० रुपये आहे. मागील वर्षी प्रति १० ग्रॅम ५७००० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा जागतिक बाजारात स्थिरता निर्माण होते. तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात.

    आता लोकसुद्धा स्टॉक मार्केटसारख्या इतर उपकरणांमध्ये गुंतवणूक करायला लागले आहेत. ज्या ठिकाणावरून कमी दिवसांत अधिक उत्पन्न मिळते. तसेच अमेरिकेत व्याजदर वाढले आहेत आणि रोजगाराच्या आकडेवारीतदेखील सुधारणा झाली आहे. तसेच बॉण्ड्ससारख्या साधनांवर भेटणाऱ्या वाढत्या परताव्यामुळे सोने कमकुवत होत चालले आहे.

    गत वर्षी कोरोना वायरसमुळे २०२० मध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ज्यामुळे लोकांकडून गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधण्यात येत आहेत. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते. कोरोनामुळे लोकांनी शेअर बाजारामधील गुंतवणूक कमी केली, कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक आहे.