13 दिवसात सोने दरात 2238 रुपयांची घट; सोनं आणखी स्वस्त होणार

जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 42 हजार 500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 5870 रुपयांची घट झाली आहे.

    मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 238 रुपयांची घट नोंदवली गेली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरातील घट अशीच सुरू राहील अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

    जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 42 हजार 500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 5870 रुपयांची घट झाली आहे.

    सोन्याची किंमत सध्या त्याच्या सर्वाधिक किमतीपेक्षा 11 हजार 922 रुपयांनी खाली उतरली आहे. अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात 2.5 टक्क्यांची घट करण्यात आल्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांत मोठी घट झाली.