२ महिन्यांच्या दरवाढीनंतर पुन्हा गडगडले सोन्याचे भाव, जाणून घ्या

सोन्याच्या दरांत घट दिसत असताना उलट, चांदीमध्ये काहीशी तेजी झाल्याचे दिसले आहे. मे वायद्याच्या चांदीचा दर (Silver Price) ०.४५ टक्क्यांनी वाढला आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत वाढून, दोन महिन्यांच्या उच्चांकी किंमतीवर प्रति १० ग्रॅम ४७,८५० रुपये झाली होती.

    मुंबई : जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे मंगळवारी (२० एप्रिल) भारतातील सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) घट दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) जून वायदा सोन्याच्या भावात ०.२९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांत घट दिसत असताना उलट, चांदीमध्ये काहीशी तेजी झाल्याचे दिसले आहे. मे वायद्याच्या चांदीचा दर (Silver Price) ०.४५ टक्क्यांनी वाढला आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत वाढून, दोन महिन्यांच्या उच्चांकी किंमतीवर प्रति १० ग्रॅम ४७,८५० रुपये झाली होती.

    मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याची किंमत १३९ रुपयांनी घसरून, ४७,२४५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. मागील सत्रात सोने ४७,८५०रुपयांवर पोहोचले होते. एमसीएक्सवर चांदीचा भाव (Silver Price on MCX) : औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीला सुगीचे दिवस आले आहेत. एमसीएक्सवर मे वायदा चांदीचे दर २२५ रुपयांनी वाढून, ६८,६३५रुपये प्रतिकिलोवर बंद झाले. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरांत मंदीचे वातावरण आहे. अमेरिकन ट्रेझरी यील्ड्सच्या रिबाऊंड दरम्यान सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली.