सलग दुसर्‍या दिवशी सोनं महागलं, चांदीच्या किंमतीत इतक्या रूपयांची वाढ ; जाणून घ्या

दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती प्रति किलो 952 रुपयांची वाढ झाली, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर पिवळ्या धातूच्या वाढीला याचा आधार मिळालाय. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 285 रुपयांनी वाढून 48,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,607 रुपयांवर बंद झाले होते.

    नवी दिल्लीः देशांतर्गत बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोने-चांदीच्या किमती (Gold-Silver Price)वाढल्यात. जागतिक मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतीत (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 285 रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणेच चांदीही वाढली.

    दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमती प्रति किलो 952 रुपयांची वाढ झाली, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर पिवळ्या धातूच्या वाढीला याचा आधार मिळालाय. दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 285 रुपयांनी वाढून 48,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 48,607 रुपयांवर बंद झाले होते.

    गेल्या व्यापार सत्रात चांदीची किंमत 70,898 रुपये प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 1,912 डॉलर झाली. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत कोणताही विशेष बदल झाला नाही आणि तो औंस 28.32 डॉलर होता.