सोने महिनाभरात 2000 रुपयांनी महागले

कोरोना संकटातही सोने आणि चांदीची झळाळी कायमच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक बदलानंतर सोमवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 49,323 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा दर 71,575 रुपए प्रतिकिलोग्रामवर पोहोचला आहे. मे महिन्यात सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 2,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात 3,570 रुपयांची वाढ झाली आहे.

    मुंबई : कोरोना संकटातही सोने आणि चांदीची झळाळी कायमच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक बदलानंतर सोमवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 49,323 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा दर 71,575 रुपए प्रतिकिलोग्रामवर पोहोचला आहे. मे महिन्यात सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 2,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात 3,570 रुपयांची वाढ झाली आहे.

    मे महिन्यात सोने 2,184 रुपयांनी महागले आहे. 30 एप्रिल रोजी सोने 46,791 रुपए प्रति 10 ग्राम दराने विकल्या गेले. सोमवारी सोन्याचा दर 49,323 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास, 30 एप्रिल रोजी चांदीचे दर प्रति 10 किलो 67,800 रुपये होते, जे सोमवारी 71,370 रुपयांवर पोहोचले. म्हणजेच मे महिन्यात चांदीच्या दरात 3,570 रुपयांची वाढ झाली. यापूर्वी एप्रिल महिन्यात सोने 2,601 आणि चांदी 4,938 रुपयांनी महाग झाली होती.

    देशातील सर्वात मोठी दागिणे निर्मिती संघटना इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोन्याच्या दरात तेजी आली आहे. हे पाहता, चालू वर्षाखेरीस सोन्याचे दर 57 हजार रुपये प्रति 10 ग्रामवर जाऊ शकतात. याचबरोबर, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर सातत्याने वाढत चालले आहे. त्यामुळे वर्षाखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर 2,200 अमेरिकन डॉलर प्रति औंस वर पोहोचतील, असा अंदाज मेहता यांनी वर्तविला आहे.