सोने-चांदीत दरवाढ; जाणून घ्या आजचा भाव

शुक्रवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचे दर ४०० रुपये वाढून ५१२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.

नागपूर. रुपयाच्या विनिमय दराज घट तथा किमती धातुंच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमध्ये सुधारणा झाल्यामुळे शुक्रवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचे दर ४०० रुपये वाढून ५१२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले (gold silver price ). यापूर्वी गुरुवारी सोने ५०८०० रुपये प्रति १० ग्रॅम होते.

तसेच चांदीतही १००० रुपये वाढ झाली. चांदी ६७००० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. गुरुवारी चांदीचा भाव ६६००० रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १८५२ डॉलर प्रति औंस झाले. तर चांदी २५.४० डॉलर प्रति औंस होती.