सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे सोने-चांदीच्या भावात घसरण

सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किंमती आज सलग तिसऱ्या दिवशी कमी (Gold-silver prices fall) झाल्या आहेत. सोने (gold) ५१ हजार ३०० रूपयांवरून ५० हजार ३०० रूपये प्रतितोळा इतके झाले आहे. तर चांदी (silver) प्रतिकिलो ६१ हजारावर १ हजाराने घट झाली आहे.

नवी दिल्ली : सुवर्ण बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किंमती आज सलग तिसऱ्या दिवशी कमी (Gold-silver prices fall) झाल्या आहेत. सोने (gold) ५१ हजार ३०० रूपयांवरून ५० हजार ३०० रूपये प्रतितोळा इतके झाले आहे. तर चांदी (silver) प्रतिकिलो ६१ हजारावर १ हजाराने घट झाली आहे.सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे २ दिवसात १६०० रूपयांची घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे.

अमेरिकन डॉलरमध्ये (american doller) आलेल्या तेजीमुळे विदेशी बाजारात (Gold Price Down)सोन्याचे दर २ टक्क्यांनी कमी होऊन १८६२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारात सोने गेल्या महिन्यातील सर्वोच्च स्तरापेक्षा ६००० रुपये प्रति तोळाने कमी झाले आहे. गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६००० रूपयांनी सोने उतरले आहे.

तज्ज्ञांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आली होती. त्याचप्रमाणे आता या घसरणीनंतर देशात सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे.