सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या किंमत ?

एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) शुक्रवारी सोन्याचे दर 0.29 टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 48,440 रुपये झाले आहेत. जुलैच्या चांदीची वायदे किंमत 71,395 रुपये प्रति किलो झाली आहे.

    नवी दिल्ली: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Prices Today) आज मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 354 रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याच्या तुलनेत आज चांदीचे दर (Silver Prices Today) किरकोळ प्रमाणात उतरले आहेत.

    एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) शुक्रवारी सोन्याचे दर 0.29 टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 48,440 रुपये झाले आहेत. जुलैच्या चांदीची वायदे किंमत 71,395 रुपये प्रति किलो झाली आहे.

    एमसीएक्सवर गुरुवारी सोन्याचे दर 0.02% ने वधारले होते. या वाढीनंतर सोन्याचे दर 48,794 रुपये प्रति तोळा झाले आहेत. गुरुवारी चांदीचे दर 71,400 रुपये प्रति किलो होते.