चीनला अजून एक झटका, Google ने हटवले 2500 युट्यूब चॅनल

भारतात चीनी ॲप्स बॅन केल्यानंतर जगभरात चीनी कंटेन्ट संशयाच्या गर्तेत सापडला आहे. अमेरिका, जपान सारखे देश चीनी ॲप्स बॅन करण्याच्या तयारीला लागले आहेत. अशातच गुगलने जवळपास 2500 हून अधिक चीनशी संबंधित युट्यूब चॅनल्स हटवले आहेत.

मुंबई : Google ने चीनशी संबधित जवळपास 2,500 हून अधिक युट्यूब चॅनल डिलीट केले आहेत. टेक तज्ज्ञांच्या मते, हे चॅनल्स भ्रामक माहिती पसरविण्याचे काम करत असल्याने व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून ते हटविण्यात आले आहेत. अल्फाबेटचा मालकी हक्क असलेली कंपनी गुगलच्या मते, हे युट्यूब चॅनल्स एप्रिल आणि जून दरम्यान हटविण्यात आले आहेत. अशी माहिती चीनशी संबंधित इन्फ्लुएन्स ऑपरेशन्ससाठी सुरू असलेल्या चौकशी दरम्यान करण्यात आले अशी माहिती नवभारत टाइम्स.कॉम (Times Group) ने दिली आहे.

या चॅनल्सवर सहसा स्पॅम, नॉन-पॉलिटिकल कंटेन्ट पोस्ट करण्यात येत होता. पण यात राजकारणाशी संबंधित काही गोष्टीही होत्या.  गुगलने भ्रामक माहिती देण्यासाठी करण्यात आलेल्या ऑपरेशनच्या तिमाही बुलटेनमध्ये ही माहिती दिली असल्याचे युट्यूबने म्हटले आहे.

गुगलने अद्याप या चॅनल्सच्या नावांचा खुलासा केलेला नाही पण काही अन्य माहिती दिली आहे. ट्विटरवरही अशाच प्रकारच्या व्हिडिओ लिंक पाहण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया ॲलालिटिक्स कंपनी Graphika ने एप्रिलमध्ये डिसइन्फर्मेशन कॅम्पेनमध्ये यांची ओळख उघड केली होती अशी माहिती गुगलने दिली आहे.

अमेरिकेत चीनी दूतावासाने याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी चीनने भ्रामक आणि चुकीची माहिती पसरविण्याशी संबंधित सर्व आरोप फेटाळले आहेत.

गुगल आणि फेसबुक सारख्या कंपन्या सातत्याने भ्रामक माहिती आणि फेक न्यूज बाबत अपडेट देऊन सांगत आहेत की, ते अशा ऑनलाइन प्रपोगंडाशी कशाप्रकारे लढा देत आहेत. 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑनलाइन प्रपोगंडाचा प्रसार होण्यापासून बचाव व्हावा यासाठी गेल्या ४ वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले. गुगलने आपल्या बुलेटिनमध्ये इरान आणि रशियाशी संबंधित कामांचाही यात उल्लेख केला आहे.

अलीकडेच भारताने चीनचे खूप सारे ॲप्स बॅन केले आहेत ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे. याशिवाय अन्य दुसऱ्या चीनी ॲप्सवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. चीनी शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकलाही चीनमध्ये बॅन करण्यात आलं आहे.