एक का डबल…गुगल कंपनीचा आता शॉर्ट व्हिडिओमध्येही दबदबा, दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये केली कोट्यवधींची गुंतवणूक

रोपोसोची मालकी Glance कडे आहे, ही भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहायक कंपनी आहे. गुगलने यामध्ये १४५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीसोबतच कंपनी ग्लान्स आणि रोपोसोमध्ये आपली AI क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे.

टेक कंपनी गुगल भारतातील शॉर्ट व्हिडिओ सेक्टरमध्येही दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने एकाच दिवसात भारतातील दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.ज्या दोन अ‍ॅप्समध्ये गुंतवणूक केली त्यातील पहिलं ग्लान्सचं Roposo अ‍ॅप आणि दुसरं डेलीहंटचं Josh अ‍ॅप आहे.

रोपोसोची मालकी Glance कडे आहे, ही भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहायक कंपनी आहे. गुगलने यामध्ये १४५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीसोबतच कंपनी ग्लान्स आणि रोपोसोमध्ये आपली AI क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे.

भारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर डेलीहंटने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Josh ची सुरूवात केली. कंपनीचं हे अ‍ॅप १२ स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असून Josh अ‍ॅपकडे सध्या ३६ दशलक्ष डेली एक्टिव्ह युजर्स आणि ७७ दशलक्ष मंथली एक्टिव्ह युजर्स आहेत. १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक यामध्ये झाली आहे. दरम्यान, या दोन्ही अ‍ॅप्सचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही अ‍ॅप्समध्ये स्थानिक भाषेत कंन्टेंट मिळतो.