गुगल आपल्या ‘या’ अॅपद्वारे भारतीय व्यापाऱ्यांना देणार कर्ज

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्या, कारखाने, आणि लघु उद्योग बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता उद्योगधंदे सुरू केल्यानंतर सुद्धा काही व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक कंपन्या, कारखाने, आणि लघु उद्योग बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता उद्योगधंदे सुरू केल्यानंतर सुद्धा काही व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता गुगल आपल्या अॅपद्वारे भारतीय व्यापाऱ्यांना कर्ज देणार आहे. २०१८ मध्ये गुगल पे च्या माध्यमातून कंपनीने प्री-एप्रूव्हड कर्जाची सुविधा दिली होती.

गुगल पे भारतात लाँच केल्यानंतर फायनेंशियल बाजारावर पकड मजबूत केली आहे. त्यामुळे आता गुगल पे च्या बिझनेस अॅपद्वारे भारतातील व्यापाऱ्यांना कर्ज देणार असल्याची माहिती गुगलने सांगितली आहे. गुगलने भारतात फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा सारख्या बँकेशी भागीदारी केली होती. तसेच गुगलने आपल्या पेमेंट अॅपमध्ये नियरबाय स्टोर्स फीचर देशभरात जारी केले आहे. ही सर्व माहिती गुगल मॅप्समध्ये पिनद्वारे देखील दिसेल.