सरकारने दिली रिलायन्स जिओ आणि ब्रुकफिल्डच्या कराराला मंजुरी

भारत सरकारने रिलायन्स जिओ(reliance jio) इन्फ्राटेल कंपनीच्या वायरलेस इन्फ्रास्ट्रक्चरच्या २५,२१५ कोटी रुपयांच्या विक्रीसाठी ब्रुकफिल्ड(brookfield) असेट मॅनेजमेंटला मंजुरी दिल्याची माहिती मिळाली आहे.

टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टद्वारे रिलायन्स जिओ इन्फ्राटेल ताब्यात घेण्यास दूरसंचार खात्याने ब्रुकफिल्डला मंजुरी दिल्याची माहिती आहे. ब्रुकफिल्ड ही कॅनडामधील कंपनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील १.३५ लाख मोबाईल टॉवर्सची विक्री या कराराच्या माध्यमातून होणार आहे.

मध्यवर्ती बँकेसह अर्थ खाते, गृह खाते यांनी जुलैमध्ये या प्रस्तावला मान्यता दिली असल्याचे समजते. सरकारसमोर हा प्रस्ताव एक वर्षापूर्वी ठेवण्यात आला होता. रिलायन्स जिओने याआधीही साधारण २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळवली होती. अंबानींचा उद्देश त्यातून कर्ज कमी करणे आणि मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये हिस्सा वाढवणे हा होता.