कोरोना संकटात HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा; आता बँकेने दिलेल्या ‘या’ सुविधेचा १९ शहरांना होणार आहे फायदा, यात तुमचं शहर आहे का? वाचा सविस्तर

एकंदरीत ही सुविधा कंटेन्मेंट झोनमधील लोकांना दिली जात आहे. बँकेने म्हटले आहे की, मोबाईल एटीएमच्या सुविधेमुळे सामान्य लोकांना रोख रक्कम काढण्यासाठी आपल्या परिसराबाहेर जावे लागणार नाही. मोबाईल एटीएमच्या माध्यमातून ग्राहक 15 प्रकारचे व्यवहार करू शकतील.

    नवी दिल्ली: दररोज भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता बर्‍याच राज्यांनी लॉकडाऊन, वीकेंड लॉकडाऊन किंवा कर्फ्यू जाहीर केलाय. त्याच वेळी कंटेन्मेंट झोनमध्ये रोख रकमेची गरज असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. हे लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. एचडीएफसी बँकेने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रोख समस्येला तोंड देण्यासाठी ग्राहकांना देशभर मोबाईल एटीएमची सुविधा सुरू केली. याचा फायदा देशातील 19 शहरांना होणार आहे.

    या शहरांमध्ये लोकांना मोबाईल एटीएमची सुविधा मिळणार

    एचडीएफसी बँकेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये मोठ्या शहरांमध्ये एटीएम व्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. यात मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, लखनऊ, दिल्ली, लुधियाना अशा 19 शहरांचा समावेश आहे. बँकेची ही सुविधा त्याच ठिकाणी असेल ज्या भागात कोविडचा वाईट परिणाम झालेला आहे. एकंदरीत ही सुविधा कंटेन्मेंट झोनमधील लोकांना दिली जात आहे. बँकेने म्हटले आहे की, मोबाईल एटीएमच्या सुविधेमुळे सामान्य लोकांना रोख रक्कम काढण्यासाठी आपल्या परिसराबाहेर जावे लागणार नाही. मोबाईल एटीएमच्या माध्यमातून ग्राहक 15 प्रकारचे व्यवहार करू शकतील.

    संसर्गाचा धोका लक्षात घेता व्हॅनची स्वच्छता

    कॅश विड्रॉलच्या काळात संक्रमण पसरण्यापासून रोखण्यासाठी व्हॅनची पूर्णपणे स्वच्छता केली जाणार आहे. तसेच जे लोक बँक कर्मचार्‍यांसह रोख रक्कम काढण्यासाठी पोहोचतात, त्यांना कोरोना व्हायरस मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. एचडीएफसी बँकेने कोरोना संकटाच्या वेळीही गेल्या वर्षी ग्राहकांना या प्रकारची सुविधा दिली होती. बँकेने याची खात्री करून दिली आहे की, कोरोना संकटाच्या वेळी त्याच्या एटीएममधील पैसे तेवढेच राहिलेत. कोणालाही काही अडचण नाही. मोबाईल एटीएममधून दिवसातून 100-150 व्यवहार होतात.