स्टेट बँकेकडून गृहकर्जदारांना मोठा दिलासा

स्टेट बँकेने (State Bank of India) आपल्या किरकोळ कर्जदार आणि गृहकर्जदारांना मोठा दिलासा (Great relief to customer and home borrowers ) दिला आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज (Loan) फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी (C.S.shetty) यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने देशात होत आहे. त्यामुळे अनेकांवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या परिस्थितीमध्ये स्टेट बँकेने (State Bank of India) आपल्या किरकोळ कर्जदार आणि गृहकर्जदारांना मोठा दिलासा (Great relief to customer and home borrowers ) दिला आहे. बँकेकडून संबंधित कर्जदाराला कर्ज (Loan) फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी (C.S.shetty) यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

१ मार्च २०२० पूर्वी ज्यांनी कर्ज घेतलं आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यांनाच या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. स्टेट बँक कर्जाच्या पुनर्रचनेत पुढे असली तरी येत्या काळात आयसीआयसीआय (ICICI BANK) आणि एचडीएफसीसारख्या (HDFC BANK) बँकांकडूनही सुविधा मिळण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंतही या बँका अशी योजना आणू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

कोरोनाचा फटका बसलेल्या व्यक्तींची नोकरी किंवा त्याचा रोजगार पुन्हा केव्हा सुरू याचा विचार करून त्यावर कर्जाच्या पुनर्रचनेचा कालावधी ठरवण्यात येईल, असं शेट्टी यांनी नमूद केलं. ग्राहकांच्या उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची माहिती घेतल्यानंतर त्या व्यक्तीला किती कालावधी देण्यात येईल यावर निर्णय घेण्यात येणार आहे.