He bought the company from Emami Group for Rs 12 crore and sold it for Rs 2,000 crore

कंपनीत ‘मॉर्गन स्टॅन्ले प्रायव्हेट इक्विटी’ची 19 टक्के हिस्सेदारी असून 81 टक्के हिस्सेदारी झंडू फार्मास्युटिकल वर्क्सचे माजी प्रवर्तक असलेल्या पारीख परिवाराच्या ताब्यात आहे. पारीख परिवार आणि कोलकतास्थित इमामी समूह यांच्यात कंपनीच्या विक्रीवरून 2008 मध्ये मोठा संघर्ष झडला होता.

    मुंबई : 2008 मध्ये ‘इमामी समूहा’कडून अवघ्या 12.5 कोटी रुपयांत खरेदी केलेली ‘झेडसीएल केमिकल्स’ ही कंपनी पारीख परिवाराने आता तब्बल 2 हजार कोटी रुपयांत विकली आहे.

    खाजगी संस्था ॲडव्हंट इंटरनॅशनलने ही कंपनी विकत घेतली आहे. या सौद्यामुळे मॉर्गन स्टॅन्ले प्रायव्हेट इक्विटी एशियाचीही झेडसीएलमधून एक्झिट होणार आहे.

    सक्रिय औषधी घटक (एपीआय) व्यवसायात असलेली ‘झेडसीएल केमिकल्स लि.’ ही कंपनी पूर्वी ‘झंडू केमिकल्स लि.’ या नावाने ओळखली जात होती.