ICICI Lombard कडून पुणे आईआईएसईआरला कोविड-१९ टेस्टिंग यंत्रांसाठी आर्थिक मदत

भारतातील नॉन लाईफ विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आईआईएसईआर-IISER) वेगाने कोविड-१९ च्या चाचण्यांची क्षमता आणि वेऴ वाचविण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त आरटी-पीसीआर ( रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट्स पॉलिमर्स चेन रिॲक्शन) यंत्राची संख्या वाढविण्यासाठी वीस लाख रुपयांची मदत दिली आहे.

पुणे : भारतातील नॉन लाईफ विमा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आईआईएसईआर-IISER) वेगाने कोविड-१९ च्या चाचण्यांची क्षमता आणि वेळ वाचविण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त आरटी-पीसीआर ( रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट्स पॉलिमर्स चेन रिॲक्शन) यंत्राची संख्या वाढविण्यासाठी वीस लाख रुपयांची मदत दिली आहे. नवीन उपकरणांमुळे आयआयएसईआरची दररोजची चाचण्यांची क्षमता तीनशेवरुन एक हजारापर्यंत वाढणार आहे.

कोविड-१९ संसर्गाचा उद्रेक देशभरात वाढत चाललेला आहे, या संसर्गाचा फैलाव यशस्वीरित्या रोखण्यासाठी वेळोवेळी आरोग्याच्या चाचण्या हाच उत्तम मार्ग होय. त्यामुळे बाधित व्यक्ती लागणीच्या अगदी प्राथमिक टप्प्यात सापडत असल्याने वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात बाधित शोधले जात असल्याने त्यांच्यापासून संपर्कातील व्यक्तींना लागण होण्यास प्रतिबंध होत आहे.

सध्याच्या आव्हानात्मक स्थितीचा विचार करत संस्थेने पुण्यातील आपल्या कॅम्पसमध्ये २१ मे रोजी कोविड-१९ च्या चाचण्यांसाठी केंद्र उभारले आहे. संस्थेने १५ ऑगस्टपर्यंत पुणे आणि परिसरातून आलेल्या १५ हजार सॅम्पल्सच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आईआईएसईआरचे डीन (संशोधन आणि विकास) प्रा. संजीव गलांडे या मदतीबद्दल म्हणाले की, आयसीआयसीआय लोम्बार्डच्या महत्वपूर्ण योगदानामुळेच आमच्या कोविड-१९ केंद्रात चाचण्यांच्या वेळेत बचत झाली असून केंद्राची क्षमताही वाढली आहे. चाचण्यांसाठी आवश्यक सुविधा आणि कोविड-१९ शी संबंधित विशेष संशोधन प्रकल्पांमध्ये आमच्याकडे असलेल्या प्राविण्याचा वापर अशा दोन प्रकारे आम्ही हा हातभार लावत आहोत.

आयसीआयसीआय लोम्बार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी भार्गव दासगुप्ता म्हणाले की, समाजाच्या हितासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डने सदैव सक्रिय भुमिका बजावली आहे, कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी आम्ही कंपनी सामाजिक उत्तरदायित्व योजनेनुसार विविध उपक्रम राबवत आहोत अशा शब्दात दासगुप्ता यांनी आभार मानले.