आता मेड इन इंडिया असेल ॲपलचा iPhone 11, उत्पादन सुरू

Apple ने भारतात पहिल्यांदा आपल्या फ्लॅगशिप सीरीजचे स्मार्टफोन iPhone 11 तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही कंपनीने भारतात आयफोन तयार केले होते. पण ते टॉप ऑफ द लाइन वेरियंट नव्हते.

अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आपले लेटेस्ट फ्लॅगशिप सीरिज iPhone 11 चे उत्पादन सुरू केले आहे. iPhone 11 चे चेन्नईजवळ Foxconn प्रकल्पात उत्पादन करण्यात येणार आहे.

ॲपलने भारतात आयफोन उत्पादन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही कंपनीने काही मॉडेल भारतात तयार केली आहेत. पण पहिल्यांदा कंपनीने फ्लॅगशिप सीरीज भारतात उत्पादन करण्याचे काम सुरू केले आहे.

ईकनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार येत्या काळात ॲपल भारतात उत्पादन वाढविणार आहे. पण हे काही टप्प्यात करणार आहे. येत्या काळात भारतात iPhone 11 तयार करून दुसऱ्या देशात निर्यात करण्याच्या विचारात आहे असेही यात नमूद केले आहे.

यापूर्वी ॲपलने Foxconn च्या प्रकल्पात iPhone XR चे उत्पादन केले आहे. असे असले तरी याची किंमत तसूभरही कमी झालेली नाही. याशिवाय कंपनीने भारतात iPhone SE देखील तयार केले होते.