दोन दिवसांत सोनं एक हजार रुपयांनी स्वस्त, चांदीचाही भाव घसरला ; जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे दोन आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे. स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे.

    नवी दिल्ली – गेल्या सत्रातील जोरदार घसरणीनंतर आज पुन्हा एकदा स्थानिक वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. एमसीएक्सवर वायदा बाजारातील सोन्याचा दर 0.12 टक्यांनी घसरून 48619 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदीचा दर 0.1 टक्क्यांनी घसरून 70722 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आला आहे. सोन्याचा दर दोन दिवसांत एक हजार रुपयांनी घसरला आहे.

    आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोने मजबूत डॉलरमुळे दोन आठवड्यांचा विचार करता खालच्या स्थरावर पोहोचले आहे. स्पॉट सोने 0.4 टक्क्यांनी घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंस वर आले आहे.

    गेल्या व्यापार सत्रात यात दोन टक्क्यांची घसरण झाली होती. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 27.31 डॉलर प्रति औंसवर आली होते. प्लॅटिनम 0.7 टक्क्यांनी घसरून 1,148.50 डॉलरवर आले होते. डॉलर इंडेक्स तीन आठवड्यात 90.543 वर पोहोचला आहे.