india among worst performing economies stimulus package not enough abhijeet banerjee
भारताचा वाईट अर्थव्यवस्थेच्या यादीत समावेश, प्रोत्साहन पॅकेज पुरेसे नाही

समस्यांचा सामना करण्यासाठी सरकारने दिलेले आर्थिक प्रोत्साहन पॅकेज (Financial incentive package) पुरेसे नाही असेही त्यांनी पुढे नमूद केले.तरीही, चालू आर्थिक वर्षाच्या (current fiancial year) दुसऱ्या तिमाहीत (secind quarter) देशाच्या आर्थिक वृद्धीच्या दरात वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यव्यवस्था (Indian Economy) ही जगातील सर्वात वाईट प्रदर्शन करणाऱ्यांपैकी एक आहे असे मत नोबेल पुरस्कारप्राप्त अभिजीत बॅनर्जी (Abhijeet Banerjee) यांनी मंगळवारी (२९ सप्टेंबर) व्यक्त केले. समस्यांचा सामना करण्यासाठी सरकारने दिलेले आर्थिक प्रोत्साहन पॅकेज (Financial incentive package) पुरेसे नाही असेही त्यांनी पुढे नमूद केले.तरीही, चालू आर्थिक वर्षाच्या (current fiancial year) दुसऱ्या तिमाहीत (secind quarter) देशाच्या आर्थिक वृद्धीच्या दरात वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रख्यात अर्थतज्ज्ञांनी ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले की, देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर कोविड – १९ महामारी संकटाआधीच मंदावला होता. वास्तविक जीडीपी वृद्धी दर २०१७-१८ मध्ये ७ टक्क्यांनी कमी होऊन २०१८-१९ मध्ये ६.१ टक्क्यांवर आला होता. तर २०१९-२० मध्ये याच दरात आणखी घट होऊन तो ४.२ टक्के झाला.

भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देशाची अर्थव्यवस्था चालू तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) मध्ये पुन्हा वृद्धी झाली आहे. असंही बॅनर्जी म्हणाले.

२०२१ मध्ये आर्थिक वृद्धी यावर्षीच्या तुलनेत चांगली असणार आहे असंही बॅनर्जी म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के घसरण झाली आहे याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. काही एजन्सी आणि संस्थांनी चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दरात घट होणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

गोल्डमॅन सैक्श ने आपल्या पूर्वीच्या अनुमानालाच अनुसरून २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेत १४.८ टक्के तर फिच रेटिंग्सने १०.५ टक्के घसरण होईल असा अंदाज वर्तविला आहे. वर्तमानात मैसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एफआईटी) चे प्राध्यापक बॅनर्जी यांच्या मते, भारताचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज पुरेसे नाही. भारताचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज मर्यादित होते. हे बँकांनी दिलेले एक प्रोत्साहन होते. आपण काहीतरी आणखी पर्यायांचा विचार करायला हवा असं त्यांना वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रोत्साहन उपायांमुळे कमी वयाच्या लोकांच्या सध्याच्या खर्चात वाढ झाली नाही कारण सरकार या लोकांना पगारवाढ देण्यास इच्छुक नव्हती. सरकारने मे मध्ये २०.९७ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. यात रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या रकमेचाही समावेश होता. महागाईविषयी बोलताना बॅनर्जी म्हणाले भारताच्या आर्थिक वाढीची पद्धत ही बंद अर्थव्यवस्थेची आहे. यात सरकार अधिक मागणी नोंदविते त्यामुळे यात वाढ झाल्याने महागाईही वाढते.

भारतात २० वर्षांपर्यंत महागाई वाढतच राहिली आणि महागाईचा दरही वाढतच राहिला अशी स्थिती निर्माण झाली. वाढता महागाई दर गेल्या २० वर्षांत स्थिर राहिल्याने महागाई जास्त वाढली नाही. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त नोट छपाईबाबत विचारले असता ते म्हणाले, तूट दाखविणे हा चांगला विचार आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत बॅनर्जी म्हणाले, आत्मनिर्भर या शब्दाचा आपण जाणीवपूर्वक विचार करायला हवा आहे.

जर आपण कच्चा माल आपल्याकडेच विकत घेत असू तर आत्मनिर्भर या शब्दाला बाधा येते. आपण ज्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतो आहोत, त्यात आपण अधिक पारंगत होणे गरजेचे आहे. त्याच वस्तूंची आयात करायला हवी ज्यांची आपल्याला गरज आहे असं मतही बॅनर्जी यांनी मांडलं.

भारताला जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक राहणे गरजेचे आहे. यावर ते सरकारसोबत काम करण्यास तयार आहेत असं विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर दिलं. मी निश्चितच या प्रस्तावाचा विचार करेन. मी अशा लोकांपैकी आहे ज्यांना सतत असं वाटतं की, भारताचं भलं व्हावं. आपल्याला वैचारिक मतभेदांपासून दूर राहायला हवं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (एजन्सी)