rakesh jhunjhunwala

शेअर बाजारात ‘बिग बुल’ (Big Bull) अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नव्या एअरलाईन्समध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा निर्णय घेतला आहे. एका परदेशी गुंतवणूकदारासोबत (Foreign investor) त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

    मुंबई : भारत आणि विमान कंपनी (airline) हे आतापर्यंत कधीही फायद्याचं न ठरणारं गणित जुळवण्यासाठी आता आणखी एक मोठं नाव पुढं येत असल्याचं दिसत आहे. शेअर बाजारात ‘बिग बुल’ (Big Bull) अशी ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नव्या एअरलाईन्समध्ये गुंतवणूक (investment) करण्याचा निर्णय घेतला आहे. एका परदेशी गुंतवणूकदारासोबत (Foreign investor) त्यांची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे.

    लवकरच ही बोलणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होईल. या योजनेत राकेश झुनझुनवाला सुमारे २६० कोटी रुपये गुंतवण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांसाठी आव्हान ठरलेल्या या उद्योगाला फायदेशीर मॉडेल देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांच्या उपस्थितीत ही बोलणी सुरू आहेत. त्याला अंतिम स्वरूप आल्यानंतर देशांतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

    या कंपनीला आकाश असं नाव देण्यात येण्याची शक्यता आहे. प्राथमिक बोलणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कायदेशीर बाबी या पुढील वर्षाअखेरपर्यंत संपतील, असं सांगण्यात आलं आहे. या प्रक्रियेची सुरुवात एनओसी मिळवण्याच्या प्रक्रियेपासून होणार आहे. किंगफिशर एअरलाईन्स, जेट एअरवेज यासारख्या बड्या कंपन्या या व्यवसायात आल्यानंतर छोट्या कंपन्यांनीदेखील त्यासाठीची तयारी सुरू केल्याचं चित्र दिसत होतं. आता देशातील उद्योजक या व्यवसायत पैसा गुंतवण्याचा विचार करत असून ही सकारात्मक गोष्ट असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.