देशाचा विकास दर १२.८ टक्के; फिचचा अंदाज : २०२२ मध्ये वेगाने होणार विकास

डिसेंबर महिन्यात विकासदर वाढीच्या वेगाने कोरोनापूर्व काळातील स्तर पार केला आहे. तिमाहीत वार्षिक आधारावर विकास दरात ०.४ टक्के वाढ झाली असून याद्वारे गेल्या तिमाहीत विकासदरात ७.३ टक्क्यांची घट झाली होती.

  नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, दिल्ली.

  फिच रेटिंगने पुढील आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताचा विकास दराचा अंदाज गेल्यावेळच्या तुलनेत वाढविला असून १२.८% केला आहे. पहिल्या रेटिंग एजन्सीने पुढील आर्थिक वर्षासाठी विकास दर ११ टक्के राहणार असल्याचा अंदजा व्यक्त केला होता त्यात आता वाढ केली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या मंदीच्या स्थितीतून भारत बराच सावरला असल्याचे फिचने म्हटले आहे. मजबूत प्रभाव महसुली प्राप्ती आणि कोरोना संक्रमण रोखण्यात केलेल्या उपाययोजना यामुळे आर्थिक वृद्धीचा दर वाढणा असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

  तिमाहीत झाली होती घट

  तथापि, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन कोरोनापूर्व काळातील अंदाजापेक्षा कमी असेल, असेही फिचने म्हटले. डिसेंबर महिन्यात विकासदर वाढीच्या वेगाने कोरोनापूर्व काळातील स्तर पार केला आहे. तिमाहीत वार्षिक आधारावर विकास दरात ०.४ टक्के वाढ झाली असून याद्वारे गेल्या तिमाहीत विकासदरात ७.३ टक्क्यांची घट झाली होती. २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था मंदीत होती परंतु त्यानंतर आता बरीच सावरली आहे असे एजन्सीने म्हटले. कोरोनावर केंद्रशासित तसेच राज्य सरकारांनी नियंत्रण मिळविल्यामुळे अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत असल्याचे एजन्सीने म्हटले.

  युरोपियन युनियन ‘जैसे थे’

  भारतासह फिचने अमेरिकेचा विकासदर ६.२ टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेचा विकास दर ४.५ टक्के तर चीनचा ८.४ आणि युरोपियन युनियनचा ४.७ टक्के विकास दर राहणार असल्याचा अंदाज एजन्सीने व्यक्त केला होता. आता मात्र एजन्सीने युरोपियन युनियनच्या विकास दरात बदल केला नाही.