Indias POS business grew at an annual turnover of US 2 billion in three months vb

कंपनी सध्या देशातील १० शहरांमध्ये हे उत्पादन उपलब्ध करून देणार असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ४० शहरांपर्यंत विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. आर्थिक वर्ष २१ अखेरपर्यंत त्यांनी पीओएस व्यवसायाकडून ५ अब्ज यूएस डॉलर्स वार्षिक व्यवहार मूल्याचे लक्ष्य ठेवले आहे.

  • वित्तीय वर्ष २१ अखेरपर्यंत पीओएसकडून ५ अब्ज डॉलर्सचे वार्षिक व्यवहार मूल्य लक्ष्य

मुंबई : भारतातील सर्वात मोठी व्यापारी पेमेंट कंपनी भारतपे यांनी नुकतेच जाहीर केले की, त्यांनी उद्योगातील पीओएसमधील सर्वात वेगवान वाढीची नोंद केली आहे. भारतपेचा पीओएस व्यवसाय लाँच नंतरच्या अवघ्या तीन महिन्यांमध्ये २ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या वार्षिक व्यवहार मूल्यात वाढला आहे.

कंपनीने जाहीर केले की, त्यांचा पीओएस व्यवसाय वार्षिक व्यवहार मूल्याच्या २५% पर्यंत योगदान देतो. कंपनी सध्या देशातील १० शहरांमध्ये हे उत्पादन उपलब्ध करून देणार असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ४० शहरांपर्यंत विस्तार करण्याची त्यांची योजना आहे. आर्थिक वर्ष २१ अखेरपर्यंत त्यांनी पीओएस व्यवसायाकडून ५ अब्ज यूएस डॉलर्स वार्षिक व्यवहार मूल्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सन २०२० च्या उत्तरार्धात लाँच केलेले भारतपेचे पीओएस मशीन भारत स्वाइप हे भारतातील पहिले शून्य भाडे कार्ड मशीन आहे जे व्यापार्‍यांना शून्य व्यवहार शुल्काचा पर्याय देते. हे व्यापाऱ्यांना क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या श्रेणीतून देयके स्वीकारण्यास अनुमती देते. याव्यतिरिक्त, व्यापारी दोन्ही कार्ड आणि क्यूआर व्यवहारांची पावती तयार करू शकतो. किराणा स्टोअर मालक, रेस्टॉरंट मालक तसेच ४ – ५ आउटलेट्स असलेल्या उद्योजकांसह उद्योगातील छोट्या व्यापाऱ्यांचा भारत स्वाइपला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.