इन्फोसिसकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर

मंदीच्या काळात अनेक क्षेत्रातील नोकऱ्या जात असताना आणि अनेक उद्योगांवर गदा येत असताना इन्फोसिसने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केलीय. मंदीच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.

इन्फोसिस टेक्नॉलॉजीने नव्या वर्षापासून सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ आणि पदोन्नतीच्या अंमलबजावणीची घोषणा केलीय. कोरोना संकटाची चिंता बाजूला सारत विशेष प्रोत्साहन म्हणून १०० टक्के परिवर्ती भत्ता द्यायचंही कंपनीनं जाहीर केलंय.

इन्फोसिसच्या निव्वळ नफ्यात २०.५ टक्के वाढ झाली असून तो ४८४५ कोटी रुपयांवर पोहोचलाय. कंपनीनं सप्टेंबर तिमाहीअखेरची वित्तिय कामगिरी जाहीर केली.

टीसीएसनंही कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ आणि पदोन्नतीचा कार्यक्रम जाहीर केलीय. सप्टेंबरअखेर इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांचे संख्याबळ हे सुमारे २ लाख ४० हजार इतके आहे.