स्क्रिप्ट बाय Godrej ने सुरू केली व्हॉट्सॲपवरून संपर्क विरहित खरेदी

स्क्रिप्ट या गोदरेज अँड बॉयसच्या अव्वल फर्निचर ब्रॅण्डने आपल्या संपर्क विरहित खरेदी सुविधेची घोषणा केली आहे. स्क्रिप्ट स्टोअर्स व्हॉट्सॲपवर लाइव्ह येऊन आपली फर्निचर, ॲक्सेसरीजची अव्वल श्रेणी देऊ करणार आहेत तसेच व्हर्च्युअल स्टोअर टूर्सही ऑफर केल्या जाणार आहेत.

मुंबई: स्क्रिप्ट या गोदरेज अँड बॉयसच्या अव्वल फर्निचर ब्रॅण्डने आपल्या संपर्क विरहित खरेदी सुविधेची घोषणा केली आहे.  स्क्रिप्ट स्टोअर्स व्हॉट्सॲपवर लाइव्ह येऊन आपली फर्निचर, ॲक्सेसरीजची अव्वल श्रेणी देऊ करणार आहेत तसेच व्हर्च्युअल स्टोअर टूर्सही ऑफर केल्या जाणार आहेत.

व्हॉट्सॲप स्टोअर्स ग्राहकांना आपल्या घरात बसून सोयीस्कर आणि सुरक्षितरित्या सर्व उत्पादने बघण्यात व खरेदी करण्यात मदत करणार आहेत. ग्राहकही कॅटलॉग्ज, सवलती बघू शकतील, उत्पादनांची व्हर्च्युअल प्रात्यक्षिके बघू शकतील आणि एफएक्यूजना दिली जाणारी उत्तरेही लगेच बघू शकतील.

ब्रॅण्डने फ्लोट अँड रिज इको सिस्टमचीही घोषणा केली आहे. प्रवाही,अंत:प्रेरणाधारित व प्रेरक जीवनशैलीला उत्तेजन देणा-या डिझाइन तत्त्वज्ञानासह या परिसंस्थांमध्ये काही नवीन डेकोरकन्फिग्युरेशन्स एकत्र आणण्यात आली आहेत. जेणेकरून ग्राहकांना इच्छित अनुभवांना उठाव देणारे उत्साही वातावरण निर्माण करता येईल.

लोक त्यांचा बहुतेक वेळ घरात घालवत असल्यामुळे, घरातील जागा प्रवाही, आरामदायी व मुक्तजीवनशैली प्रत्यक्षात कशा आणू शकतील याचा नव्याने विचार करणे अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहे. मुलांना प्रभावीपणे अभ्यास करता येईल असा आरामदायी एर्गोनॉमिक सेटअप ग्राहकांना प्राधान्याने हवा आहे,असे स्क्रिप्टने केलेल्या संशोधनात दिसून आले. सध्या अत्यावश्यक झालेले होम-ऑफिस हाही काही जणांसाठी प्राधान्याचा विषय आहे. जेवणाची जागा घरातील सर्वांत मध्यवर्ती स्थानी असल्याने हे होममेकर्ससाठी अनेकविध उपक्रम व कामांच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर स्थळ आहे, असेही संशोधनात लक्षात आले आहे.

डायनिंगटेबल ही केवळ कुटुंबासाठी जेवणातून नाती घट्टकरण्याची जागा नाही, तर मुलांकडूनही अभ्यासाची जागा म्हणून वापरली जात आहे. विशेषत: आई-वडील मुलांचा अभ्यास घेत असतील, तर सर्वांना एकमेकांच्या सन्मुख बसता यावे यासाठीही उत्तम जागा ठरत आहे. या ट्रेण्ड्समुळे वर्क-फ्रॉम-होमसाठी पूरक आणि अन्य अनेक कामे करणा-या बहुकार्यात्मक फर्निचरची मागणी वाढत आहे.

फ्लोट इको सिस्टम हा सात घटकांचा संग्रह आहे- स्टडीटेबल, साइडयुनिट, ड्रॉइंगयुनिट, वॉलस्टोरेज, वॉलशेल्फ आणि छोटी किंवा मोठी बास्केट. तरल पद्धतीच्या (फ्लोटिंग) स्टोरेजमुळे सुटसुटीत कामाची जागा तयार होते आणि हातातील कामात बुडून जाण्यात कोणताही व्यत्यय येत नाही.

रिज इको सिस्टममध्ये एक मोठे ८ आसनी डायनिंग टेबल, चार स्टोरेजेस आणि दोन भिंतीवर माउंट करण्याजोग्या शेल्व्ह्जचा समावेश आहे. एक सौहार्दपूर्ण आणि समन्वयात्मक जागा निर्माण करण्यासाठी या उत्पादनांमध्ये समान डिझाइन आणि व्हिज्युअल लँग्वेजचा उपयोग करण्यात आला आहे. दंडात्मक प्रतले आणि विषुववृत्तीय सूर्यप्रकाशाद्वारे तयार होणा-या सावल्या यांच्यातील आंतरक्रियेपासून प्रेरणा घेऊन या फर्निचरचे डिझाइन करण्यात आले आहे.

स्क्रिप्ट बाय गोदरेज अँड बॉयसचे बिझनेस प्रमुख रजत माथूर या लाँचबद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले, “गेल्या काही महिन्यांत आपल्या घराचे महत्त्व अधिकच वाढले आहे आणि त्यामुळे स्टडी टेबल्स, खुर्च्या, सॉफ्ट फर्निशिंग्ज व उपयुक्ततेवर आधारित होम ॲक्सेसरीजच्या मागणीत खूप वाढ झाली आहे. आमच्या संशोधनानुसार, डायनिंग आणि स्टडी या दोन जागा ग्राहकांद्वारे अनेकविध कामांसाठी खूप वापरल्या जातात. फ्लोट आणि रिज या इको सिस्टम्स ग्राहकांमधील प्रवाह व त्यांचे वर्तन लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आल्या आहेत. या इको सिस्टम्समुळे ग्राहकांना घरात आनंद शोधण्याचे नवीन मार्ग सापडतील आणि एका प्रवाही किंवा मुक्तजीवन शैलीचा अनुभव घेता येईल. नव्याने लाँच करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप स्टोअर सुविधेमुळे आमच्या ग्राहकांना सुरक्षित व सोयीस्कर मार्गाने आमच्याशी संपर्क करता यावा, अशी आमची इच्छा आहे.”

सौंदर्यपूर्ण तसेच बुद्धिमान डिझाइन्सवर आधारित काम करणारा स्क्रिप्ट हा ब्रॅण्ड फर्निचर आणि ॲक्सेसरी डिझाइनची अनन्य अंगे ग्राहकांपुढे आणतो. ग्राहक यातील कोणताही एक घटकपदार्थ निवडून त्यांच्या गरजेनुसार व सोयीनुसार त्यांच्या जागा तयार करू शकतात किंवा संपूर्ण इको सिस्टम खरेदी करू शकतात. ही उत्पादने दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबई येथील सर्व स्क्रिप्ट स्टोअर्सवर उपलब्ध आहेत. यासाठी वेबसाइटवरून ऑनलाइन ऑर्डरही प्लेस करता येऊ शकते.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.