”पैसे गुंतवा लाखो कमवा”, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची जबरदस्त स्कीम

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी एक खास ऑफर देत आहे. या स्किममध्ये आपण दरमहा ५९५ रूपये भरून लखपती बनू शकता, तसेच या ऑफरमध्ये १ ते १० वर्षांपर्यंत ग्राहक पैसे गुंतवू शकतात. तुम्ही या स्किममध्ये किती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी एक खास ऑफर देत आहे. या स्किममध्ये आपण दरमहा ५९५ रूपये भरून लखपती बनू शकता, तसेच या ऑफरमध्ये १ ते १० वर्षांपर्यंत ग्राहक पैसे गुंतवू शकतात. तुम्ही या स्किममध्ये किती पैसे भरत आहात, त्यावर तुम्ही पैसै कमवू शकता, असं बँकेकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियानी ही जबरदस्त स्कीम २०१६ मध्ये सुरू केली होती. त्यामध्ये ‘जब चाहो लखपति बनो’ अशा नावाने एक खास स्कीम होती. बँक आपले माजी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर देऊ करत आहे. या स्कीममध्ये २ व्याजदर आहेत. त्यामुळे ग्राहक कोणतीही एक स्कीम निवडू शकतात.   

एका वर्षात लक्षाधीश बनायचे असेल तर त्याला ठेवीवर ६.६५ टक्के व्याज दिले जात आहे. तर १ वर्षापेक्षा जास्त कालावधीत लक्षाधीश बनायचे असल्यास, त्याला ६.४५ टक्के व्याज दिले जात आहे. तसेच जर ग्राहकांना ५ वर्षांतच लक्षावधी व्हायचे असेल तर त्यांना दरमहा १४११ इतकी रक्कम गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यामुळे ५ वर्षानंतर बँक ग्राहकांना १ लाख रूपये देईल. परंतु  दहा वर्षांसाठी दरमहा ५९५ रुपये गुंतवणूक केली असता, बँक ग्राहकांना दहा वर्षानंतर १ लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं जात आहे.