Kansai Nerolac Introduces Indias First AntiViral Paint Excel Virus Guard
कन्‍साई नेरोलॅकतर्फे भारताचा पहिला ॲण्‍टी-व्‍हायरल पेंट 'एक्‍सेल व्‍हायरस गार्ड' सादर

  • जपनी शिक्‍की तंत्रज्ञानाचे पाठबळ
  • अद्वितीय फॅब्रिक फिनिश असलेला इंटीरिअर पेंट

मुंबई : कन्‍साई नेरोलॅक पेंट्स लि. (केएनपीएल) या भारतातील आघाडीच्‍या पेंट कंपनीने भारताचा पहिला ॲण्‍टी-व्‍हायरल पेंट ‘एक्‍सेल व्‍हायरस गार्ड’ विकसित केला आहे. या इंटिरिअर इमल्‍शन पेंटमध्‍ये सक्रिय ॲण्‍टी-व्‍हायरल व ॲण्‍टी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत, जी ९९.९ टक्‍के जीवाणू दूर करतात. नेरोलॅकने भावी पिढ्यांना आरोग्‍यदायी व सर्वोत्तम वातावरण देण्‍यासाठी दशकापासूनच्‍या तंत्रज्ञान कौशल्‍यांच्‍या माध्‍यमातून उत्‍पादने व सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍याप्रती सातत्‍याने काम केले आहे.

‘कलर्स दॅट केअर’ या नवीन तत्त्‍वाला अधिक पुढे घेऊन जात नेरोलॅकचा आधुनिक नाविन्‍यपूर्ण ‘एक्‍सेल व्‍हायरस गार्ड’ हा ग्राहकांसाठी बहुमूल्‍य उत्‍पादन असून त्‍यांच्‍या घरांना सुरक्षित ठेवतो. नेरोलॅक ‘एक्‍सेल व्‍हायरस गार्ड’ आर्द्रता व दुर्गंधी दूर करण्‍यामध्‍ये मदत करतो. त्‍यामधील सक्रिय घटक पेंटला अद्वितीय फॅब्रिक फिनिश देतात, जे भिंतींना नैसर्गिक आकर्षकता देतील. ‘फॅब्रिक फिनिश’ भिंतींमधील आकर्षकता अधिक वाढवते.

हा नवीन पेंट या महिन्‍याच्‍या सुरूवातीला देशाच्‍या उत्तर भागांमधील बाजारपेठांमध्‍ये सादर करण्‍यात आला आहे आणि कंपनी भारतभरातील मागण्यांची पूर्तता करण्‍यासाठी पुरवठा वाढवत आहे. या पेंटमधील ९९.९ टक्‍के जीवाणू कमी करण्‍याचा गुणधर्म पेंटला घरांसाठी, तसेच रूग्‍णालये, व्‍यावसायिक संकुल व शैक्षणिक संस्‍था इत्‍यादी ठिकाणांसाठी देखील उपयुक्‍त बनवतो.

कन्‍साई नेरोलॅक एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्‍हणून भारताच्‍या महामारीचे निर्मूलन करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये योगदान देण्‍याशी कटिबद्ध राहिली आहे. एक ब्रॅण्‍ड म्‍हणून नेरोलॅक सातत्‍याने उत्‍पादनांमध्‍ये नाविन्‍यता आणण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे, ज्‍यामुळे अनेकांच्‍या जीवनांमध्‍ये सकारात्‍मक बदल घडून आला आहे. नेरोलॅक 'एक्‍सेल व्‍हायरस गार्ड' हे याच दिशेने सादर करण्‍यात आलेले आणखी एक उत्‍पादन आहे. हा पेंट वैविध्यपूर्ण उत्‍पादन असून त्‍यामध्‍ये ॲण्‍टी-व्‍हायरससोबत ॲण्‍टी-ऑडर व ॲण्‍टी-ह्युमिडीटी गुणधर्म आहेत. आम्‍ही आशा करतो की, या पेंटचा वापर देशातील राहणीमान स्थिती आरोग्‍यदायी व सुरक्षित बनवण्‍यामध्‍ये बहुमूल्‍य साह्य करेल.

अनुज जैन, कार्यकारी संचालक, कन्‍साई नेरोलॅक पेंट्स लि.