महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

  • कृषी मालाची वाहतूक होणार वेगवान

कोल्हापूर.  देशातील शेतकऱ्यांना कृषीमाल नियोजित स्थळी वेगाने पोहोचविता यावा यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘किसान रेल’ सुरू करण्यात आली आहे. याची तिसरी फेरी अलीकडेच कोल्हापूर ते मनमाड दरम्यान पार पडली. ज्यामुळे या हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.

किसान रेल ही कोल्हापूर ते मनमाडच्या अतिरिक्त लिंकसोबत देवलाली ते मुजफ्फरपूर दरम्यान धावली. यामुळे पंढरपूर, अहमदनगर भागातील शेतकऱ्यांनाही याचा फायदा झाला. रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या २३५. ४४ टन मालाची वाहतूक करण्यात आली. यामध्ये सफरचंद, निंबू, फुलकोबी, मासोळी, मिश्र भाज्या, मिर्ची, शिमला मिर्ची, कांदी, लहसून, अंडी आदि मालांचा समावेश होता. सोलापूर विभाग ते बेलवंडी रेल्वे स्टेशन दरम्यान पहिल्यांदाच अशा स्वरूपाची रेल्वे धावल्याने या पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. द्राक्षे आणि केळी यासारखा नाशिवंत कृषीमाल नियोजित बाजारपेठेत वेळेत पोहोचणार असल्याने कृषी व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अलीकडेच ‘किसान रेल्वेच्या’ पहिल्या फेरीला हिरवी झेंडी दाखवून या गाडीचा शुभारंभ केला होता. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा कृषीमाल देशातील बाजारपेठेत वेगाने पोहोचविता यावा आणि कृषी व्यवसाय वेगवान व्हावा यासाठी हा कृषिपयोगी प्रयोग राबविला जात आहे. यामुळे नाशिवंत कृषीमालही देशातील मोठ्या बाजारपेठेत नियोजित वेळेत पाठविता येईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे मत रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर तसेच केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ यांनी ‘किसान रेल’ या कृषी हितोपयोगी संकल्पनेला हिरवी झेंडी दाखविली होती. आता प्रत्यक्षात ही रेल्वे सुरू झाल्याने कृषिमाल वाहतुकीचा वेग वाढणार आहे. मध्य रेल्वे ‘बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या’ माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एमपीएमसी आणि विपणन व्यवस्थेसोबतच बैठक करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या जाणार आहे.