know these 4 things will change from 1 november 2020 lpg price indane gas booking number and delivery authentication code
१ नोव्हेंबरपासून बदलणार घरगुती गॅस सिलेंडरबाबतचे ४ नियम, क्लिक करा आणि जाणून घ्या

१ नोव्हेंबरपासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. सामान्यांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडर मिळण्याच्या प्रक्रियेतही काही बदल होणार आहेत.

नवी दिल्ली : १ नोव्हेंबरपासून काही महत्त्वाचे बदल (Rules Changes) होणार आहेत. सामान्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे. यात एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरी सिस्टमपासून (LPG Cylinder Home Delivery) घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीचा समावेश आहे. या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

एक तारखेपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नवीन सिस्टिम लागू होणार आहे. ज्यामध्ये तुम्ही ओटीपीशिवाय सिलेंडर घेऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे इंडेन गॅसने त्यांचा सिलेंडर बुकिंग क्रमांक देखील बदलला आहे. त्यामुळे एक तारीख येण्याआधी या बदलांविषयी जाणून घ्या जेणेकरून पुढच्या महिन्यात तुम्हाला कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही

१. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी द्यावा लागणार ओटीपी For Booking Give OTP

सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठविण्यात येईल.

डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड क्रमांक सांगावा लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी देण्यात येईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला १०० स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येईल.

२. १ नोव्हेंबर आधी अपडेट करा तुमचा मोबाइल क्रमांक Apdate Your Mobile Number

ओटीपी सिस्टम लागू झाल्यानंतर ग्राहकांकडे एलीपीजी डिलिव्हरी घेताना त्यांचा मोबाइल असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्यामधील मोबाइल क्रमांक अपडेटेड असणेही अनिवार्य आहे. जर एखाद्या ग्राहकाने त्याचा मोबाइल नंबर डिस्ट्रिब्युटरकडे अपडेट केला नसेल, तर डिलिव्हरी बॉयकडे याबाबतचे एक App असेल. ज्या माध्यमातून तुम्ही त्या क्षणीच तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करू शकता आणि ज्यानंतर कोड मिळेल. ज्या ग्राहकांचा पत्ता किंवा मोबाइल क्रमांक चुकीचा आहे, अशांना समस्या निर्माण होऊ शकते. या कारणांमुळे त्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी थांबवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा नियम व्यावसायिक वापरासाठीच्या एलीपीजी सिलेंडरसाठी लागू असणार नाही.

३. इंडेन (Indane) ने बदलला बुकिंग क्रमांक Changes In Booking Number

तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे.

याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल.

४. बदलणार एलपीजी गॅसच्या किंमती Changes LPG Gas Cylinder Prices

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एलीपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर करतात. यानुसार किंमती वाढू देखील शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.