Launch of Ikeas new gallery Inauguration by Tourism Minister Aditya Thackeray
‘आयकिया’च्या नवीन दालनाचा शुभारंभ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

५.३ लाख चौरस फुट एवढ्या भव्य जागेत ही अस्थापना विस्तारली असून त्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासाठी ही एक ‘फन डे आऊट’ व्यवस्था ठरेल, याची पूर्ण खात्री कंपनीला आहे. आरोग्य, सुरक्षा आणि जीवन कल्याण या गोष्टींना आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने ग्राहकांना स्टोअरमधील प्रवेशासाठी the IKEA India website वर पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.

मुंबई, इंग्का समूहाचा एक भाग असलेली जागतिक स्तरावरील आघाडीची स्वीडिश गृह फर्निशिंग किरकोळ विक्रेता कंपनी ‘आयकिया’ने शुक्रवारी सकाळी नवी मुंबई येथील आपल्या दालनाचा शुभारंभ केला. ‘आयकिया’ दालनाच्या शुभारंभ प्रसंगी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, एमआईडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अंबालागन, आयकिया इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य निरंतरता अधिकारी पीटर बेझेल आणि ‘आयकिया इंडिया’चे विपणन व विस्तार व्यवस्थापक आणि महाराष्ट्र व्यवस्थापकीय संचालक पर हॉर्नेल हजर होते. हा स्टोर सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान दररोज खुला राहणार आहे. नवी मुंबई येथील हा स्टोर ही ‘आयकिया’ची भारतातील दुसरी आस्थापना असून महाराष्ट्रातील अशा भव्य प्रकारातील तो पहिलाच स्टोर आहे.

‘आयकिया’ नवी मुंबई स्टोरची सुरुवात ही कंपनीसाठी एक अत्यंत महत्वाची अशी बाब असून कंपनीने येथे ५ दशलक्षहून अधिक लोक प्रतिवर्षी येतील असा अंदाज बांधला आहे. ठाणे-बेलापूर रोडवर हा स्टोर स्थित असून तो तुर्भे स्थानकापासून साधारण ६०० मीटरवर आहे. ५.३ लाख चौरस फुट एवढ्या भव्य जागेत ही अस्थापना विस्तारली असून त्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासाठी ही एक ‘फन डे आऊट’ व्यवस्था ठरेल, याची पूर्ण खात्री कंपनीला आहे. आरोग्य, सुरक्षा आणि जीवन कल्याण या गोष्टींना आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने ग्राहकांना स्टोअरमधील प्रवेशासाठी the IKEA India website वर पूर्वनोंदणी अनिवार्य आहे. या आस्थापानेमध्ये ग्राहकांना ७००० अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने डिझाईन केलेली, किफायतशीर, उत्तम दर्जाचे, रोजच्या वापरातील आणि टिकाऊ घरगुती फर्निशिंग उत्पादने उपलब्ध आहेत. त्याशिवाय मुंबईतील प्रत्येक कुटुंबाला हव्याहव्याशा वाटतील अशा संकल्पना आणि प्रेरणा यांचा भरणा येथे असेल.

‘आयकिया इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य निरंतरता अधिकारी (सीईओ आणि चीफ सस्टेनेबीलीटी ऑफिसर) पीटर बेझेल म्हणाले, “आजचा दिवस हा एक मैलाचा दगड ठरणार आहे, कारण मुंबई ही ‘आयकिया’साठी सर्वप्रथम बहुमाध्यम बाजारपेठ आहे. आता या माध्यमातून अनेक लोक आमच्या या स्टोअरला भेट देवू शकतात, ऑनलाइन खरेदी करू शकतात किंवा त्यांची आवडती व किफायतशीर उत्पादने आमच्या ‘क्लिक अँड कलेक्ट’ सेवेच्या माध्यमातून मिळवू शकतात.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “आज महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य असून सरकारचे सहकार्य हा त्यातील एक महत्वाचा असा घटक आहे. सरकार ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या बाबतीत महत्वाची अंतर्भूत कामगिरी पार पाडत असते. ‘आयकिया’च्या नवी मुंबई स्टोरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारसंधी तर उपलब्ध होणार आहेतच पण त्याचबरोबर इतर अनेक कंपन्यांना महाराराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या योजनांना गती देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी नवी मुंबई येथील हा स्टोर हे एक मोठे प्रागतिक असे पाऊल आहे. आम्ही महाराष्ट्रात ‘आयकिया’चे स्वागत करतो!”

नवी मुंबई येथील या स्टोरमध्ये मुलांसाठीचा ‘आयकिया’चा जगातील सर्वाधिक आकाराचा असा ‘स्मॉललँड’ हा विभाग असून त्याचबरोबर येथे १०००० आसनक्षमतेचे भव्य असे रेस्टॉरंट असेल. त्यात जवळजवळ सर्वच स्थानिक पातळीवर तयार झालेले अन्नपदार्थ असतील. ‘आयकिया’ने मुंबईतील तब्बल २००० हूनही अधिक घरांना भेटी देत येथील नागरिकांच्या गरजा, त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या आकांक्षा यांचा अभ्यास केला आणि त्या माध्यमातून येथील जीवनमानाशी सुसंगत अशी रचना केली आहे. या सर्वेक्षणाचे प्रतिबिंब ५० खोल्यांच्या रचना, ६ घरे आणि १० व्हीनेट या सर्व गोष्टींमध्ये उमटले आहे. त्यातून मुंबईतील राहणीमानाचे प्रतिबिंब उमटते. ‘आयकिया’ने या माध्यमातून छोट्या जागा, स्टोरेज आणि इतर गोष्टींची रचना, तरल जीवनपद्धतीसाठी बहुउपयोगी गोष्टी या बाबी साध्य केल्या आहेत.

२०३० पर्यंत ‘आयकिया’ने ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक नियोजित केली असून त्या माध्यमातून महाराष्ट्रातील तब्बल २५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून ‘आयकिया’ ६००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यातील ५० टक्के रोजगार महिलांना मिळतील. मुंबईतील या स्टोअरच्या माध्यमातून येथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी मिळतील, अशी अपेक्षा आहे. नवी मुंबईतील ‘आयकिया’ स्टोअरमध्ये तब्बल १००० लोकांना सहकर्मचारी म्हणून रोजगार मिळणार असून त्यातील ५०% महिला असतील. त्यातील ४०% टक्के कर्मचारी हे नवी मुंबईतील असतील.

सध्या, या स्टोअरमध्ये ७० टक्क्यांहूनही अधिक सहाय्यक कर्मचारी असून त्यांत विशेष करून हाऊस किपिंग आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी तुर्भे आणि घणसोली या आसपासच्या भागातील आहेत. नवी मुंबई स्टोरनंतर २०२१मध्ये दोन आणखी शहरकेंद्री ‘आयकिया’ स्टोर सुरु होणार असून मुंबईतील अनेकानेक लोकांपर्यंत त्या माध्यमातून पोहोचण्याचा मानस आहे. ‘आयकिया’ हैद्राबाद आणि पुणे येथे सध्या ऑनलाइन उपलब्ध आहे. २०२२ पर्यंत १०० दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे महत्वाकांक्षी लक्ष्य आहे.