पीएनबीच्या डिजीटल बँकिंग मोहिमेचा शुभारंभ

पंजाब नॅशनल बँक देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँकेने कॉर्पोरेट मुख्यालय नवी दिल्ली येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

मुंबई : पंजाब नॅशनल बँक देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँकेने कॉर्पोरेट मुख्यालय नवी दिल्ली येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी)  सी.एच. एस.एस. मल्लिकार्जुन राव यांनी ध्वजारोहण केले. कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मल्लिकार्जुन राव यांनी आपल्या ग्राहकांना बँकिंग गरजांसाठी डिजिटल बँकिंग चॅनेलमध्ये प्रवेश करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून पीएनबीची नाविन्यपूर्ण “डिजिटल अपनाएँ” “डिजिटलचा वापर करा” या डिजीटल बँकिंग मोहिमचा शुभारंभ केला. ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजीटल बँकिंग सेवेचा वापर करावा हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेचा कालावधी १५ ऑगस्ट २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत असेल. पीएनबीच्या या मोहिमेमुळे ग्राहकांना डिजीटल चॅनल वापरण्याची परवानगी मिळणार आहे.