भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर, जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देऊ केली आहे. तसेच आपल्या ग्राहकांना आनंदीत ठेवण्यासाठी, कंपन्या नवनवीन योजना तयार करत असतात. तसेच आज एअरटेल,

 नवी दिल्ली : भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देऊ केली आहे. तसेच आपल्या ग्राहकांना आनंदीत ठेवण्यासाठी, कंपन्या नवनवीन योजना तयार करत असतात. तसेच आज एअरटेल, रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल या कंपन्यांनी नवीनतम योजना आणल्या आहेत. एअरटेल कंपनीने तीन नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. त्यांची किंमत ९९ रुपये, १२९ आणि १९९ रुपये आहे. परंतुत ९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १८ दिवसांची आहे. यात १ जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह १०० एसएमएस मिळतात. तसेच जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन योजना आणल्या आहेत.

जिओची दररोज २ जीबी डेटाची किंमत २३९९ आणि २५९९ रुपये आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अमर्यादित कॉलिंग मिळते. त्याचप्रमाणे बीएसएनएल या सरकारी कंपनीने २३९९ रुपयांच्या योजनेत अमर्यादित कॉलिंग केवळ ६०० दिवसांसाठी उपलब्ध केली आहे. तसेच ३६५ रुपयांचा प्लॅन केवळ ३६५  दिवसांच्या वैधतेसह येतो. यात अमर्यादित कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात.