लेग्रँड इंडिया’चे डेटासेंटर इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लाँच

लेग्रँड इंडियाच्या वतीने आज लेग्रँड डेटा सेंटर सोल्युशन्स (एलडीसीएस) च्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून लेग्रँड , न्यूमेरिक, रारीतान अँड सर्वर टेक्नोलॉजी या वैश्विक ब्रँडचा पोर्टफोलियो एका खास टीम अंतर्गत आणला.

मुंबई: लेग्रँड इंडियाच्या (Legrand India) वतीने आज लेग्रँड डेटा सेंटर सोल्युशन्स (एलडीसीएस) च्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून लेग्रँड (Legrand), न्यूमेरिक, रारीतान अँड सर्वर टेक्नोलॉजी या वैश्विक ब्रँडचा पोर्टफोलियो (portfolio) एका खास टीम अंतर्गत आणला. एलडीसीएस’च्या निर्मितीमुळे वाढीला कमाल लवचिकता प्राप्त होणार आहे, सोबतच कंपन्यांना सहजतेने आणि किफायतशीर पद्धतीने विस्तारण्याची संधी राहील, कमीत-कमी कालावधीत तंत्रज्ञान तसेच ॲप्लिकेशन सुधारणे किंवा बदलणे शक्य होईल. लेग्रँड डेटा सेंटर सोल्युशन्स आटोपशीर, मोजण्यायोग्य आणि कस्टमायजेबल (स्वत:च्या पसंतीनुरूप उपलब्ध) आहेत, तसेच ती आगामी वेग लक्षात घेऊन तयार केली आहेत.

डेटा सेंटरमध्ये (data center) गुंतागुंतीच्या ॲप्लिकेशनचे होस्टिंग चालते. इथे अतिशय कठीण कामकाज सुरू असते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. त्याचप्रमाणे गरजा नेहमीच वाढत असतात. स्वत:च्या आवश्यकतेनुरूप पर्याय एखाद्याकरिता गरजेचा ठरतो. कामगिरी आणि कार्यकुशलता महत्त्वाची असते. ही गरज ओळखून एलडीसीएसने सर्वसमावेशक डेटा सेंटर तयार केली आहेत. त्यात हायपर स्केल ते मायक्रो डेटा सेंटरचा समावेश आहे. याद्वारे विविध प्रकारचे सर्वर आणि नेटवर्क रॅक, सर्व स्थितीत उच्च-कार्यक्षम कुलिंग पर्याय, उद्योग क्षेत्राला आवश्यक उच्च कामगिरीक्षम पीडीयु आणि स्वीच कमीत-कमी सुरक्षेकरिता कोणतेही इन्स्टॉलेशन कॉन्फीगरेशन आणि तपास / डिटेक्शन तसेच नियंत्रण/कंट्रोल आणि संरक्षण पर्याय देऊ केले जातील. केवळ इतकेच नाही, तर पूर्ण क्षमतेचा तीन फेज युपीएस वैविध्यपूर्ण सोपी, सुरक्षा प्रदान करतो. ज्याला भारतीय संशोधन आणि विकासाचे तसेच निर्मिती क्षमतेचे पाठबळ आहे. कोणत्याही उद्योगक्षेत्राकडून या पर्यायाला पसंती मिळणार आहे. एलडीसीएस’मध्ये ऑल-इन-वन मायक्रो डेटा सेंटर सोल्युशन्सचा समावेश असून याद्वारे छोट्या कार्यालयांना संपूर्ण आणि आटोपशीर सर्वर रूम साहित्य देऊ करण्यात येते.

लेग्रँड इंडियाच्या वतीने आगामी व्यवसाय कामकाज तसेच ब्रँड पोर्टफोलियोविषयी बोलताना एमडी आणि सीईओ टोनी बेरलँड म्हणाले की, “भारतातील डेटासेंटर अतिशय वेगाने वाढत आहेत. आम्ही सुमारे 8.5% वाढीचे साक्षीदार आहोत. क्षेत्रातील कंपन्या डिजीटल स्वीकर करत आहेत. आमचे वैश्विक अस्तित्व, अनुभव, देऊ करण्यात येणाऱ्या सेवा आणि भारतातील सध्याचा ब्रँड पोर्टफोलियो पाहता ही वेळ आमचे उद्दिष्ट निश्चित करण्याची आणि भारतातील डेटा सेंटर बाजाराला साह्य करून त्याला आगामी काळाकरिता सुसज्ज करण्याची आहे, असे वाटते.”

याविषयी माहिती देताना एलडीसीएसचे बिझनेस हेड संजय मोटवानी म्हणाले की, “आम्ही वैविध्यपूर्ण असून भारतात एकाच छताखाली अनेक ब्रँड घेऊन आलो आहोत. आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान वळवून घेतले आहे. कंपन्यांना कामकाजात अग्रेसर राहता यावे म्हणून त्यांना मदत करण्याचा आमचा उद्देश आहे. आमचे उत्पादन पर्याय हे वेग लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. सध्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यांना अनुरूप पर्याय देऊ करणे आवश्यक असते. हे पर्याय लवचीक, वेगवान आणि मोजण्यायोग्य असले पाहिजेत. सरकारने डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर विकास उपक्रमाला हातभार लावला आहे. या ब्रँडवरील विश्वास सार्थ ठरविण्यासाठी अधिकाधिक कारणे असून त्याद्वारे लेग्रँड डेटा सेंटर सोल्युशन्सच्या यशोगाथेला अनेक पैलू उलगडणार आहेत.”