लॉकडाऊनच्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता ?

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे देशाची आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. तसेच या लॉकाडाऊनच्या काळात अनेक कंपन्या, बाजार, आणि व्यवसाय बंद करण्यात आले होते. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत लवकरच ५०

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे देशाची  आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. तसेच या लॉकाडाऊनच्या काळात अनेक कंपन्या, बाजार, आणि व्यवसाय बंद करण्यात आले होते. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत लवकरच ५० हजारांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  तज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ८० हजार रूपये प्रतितोळा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे, ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.     

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यातील सोमवारी सोन्याच्या किंमतीत ८५ रूपये प्रतितोळा, तर चांदीमध्ये १४४ रूपयांची घसरण झाली होती. भारताच्या राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचे भाव ४८,९८८ रुपयांवरून कमी होत ४८९३१ रुपये प्रति तोळा झाले होते. परंतु आता सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ होणार असून, एक इतिहास रचणार आहे.  सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढली असून गुंतवणूकदारांची पहिली पसंती सोने ठरत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडण्याची शक्यता आहे.