gold mortgage

निश्चित मर्यादेनंतर सोनं खरेदी केल्यास सोन खरेदी करणारा अडचणीत येऊ शकतो. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (CBDT) गाइडलाइननुसार एका निश्चित मर्यादेनंतर अधिक सोनं खरेदी करता येणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना सोने खरेदी बाबत माहिती देणे इनकम टॅक्स नुसार बंधनकारक आहे.

  नवी दिल्ली : भारतात अनेक जण गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. तर काही जण हौस म्हणून सोनं खरेदी करतात. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त सोनं खरेदी करणे महागात पडणार आहे. लिमीटपेक्षा जास्त सोनं खरेदी केले तर इनकम टॅक्सची धाड पडू शकते.

  निश्चित मर्यादेनंतर सोनं खरेदी केल्यास सोन खरेदी करणारा अडचणीत येऊ शकतो. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या (CBDT) गाइडलाइननुसार एका निश्चित मर्यादेनंतर अधिक सोनं खरेदी करता येणार नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना सोने खरेदी बाबत माहिती देणे इनकम टॅक्स नुसार बंधनकारक आहे.

  गाइडलाइनुसार निश्चित मर्यादेनंतर सोने खरेदी केले आणि त्याबाबतचे इनव्हॉइस तुमच्याकडे नसेल तर तर आयकर कायदा कलम १३२ अंतर्गत तुमची चौकशी होऊ शकते.
  सोनं खरेदीचा अथवा सोनं कुठून आले, त्या सोन्याचा वैध स्रोत काय आहे, याचा पुरावा उपलब्ध असेल तरच तुम्हाला घरात पाहिजे तितके सोने बाळगता येवू शकते. मात्र, तुमच्याकडे सोनं असल्यास आणि तुम्ही त्याचे वैद कादगपत्रे अथवा पुरावे सादर न करु शकल्यास इनकम टॅक्सच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते.

  नियमानुसार विवाहित महिला ५०० ग्रॅम, अविवाहित महिला २५० ग्रॅम आणि पुरुषांना १०० ग्रॅम सोनं कोणताही उत्पन्नाचा पुरावा न देता घरी ठेवता येईल. तीनही प्रकारात निश्चित मर्यादेमध्ये सोनं घरात घरात ठेवल्यास आयकर विभाग सोन्याचे दागिने जप्त करणार नाही.

  भारतामध्ये अनेकांकडे त्यांच्या नातेवाइकांकडून किंवा पूर्वजांकडून भेट स्वरुपात सोनं मिळालेल आहे. याचे कोणतीही इनव्हॉइस नसते. जर, एखाद्याला गिफ्ट स्वरुपात ५०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सोन्याचे दागिने मिळाले किंवा वारसा हक्काने सोनं, सोन्याचे दागिने किंवा ऑर्नामेंट्स मिळाले असतील तर ते करयोग्य नाहीत. मात्र, हे सोनं गिफ्ट आहे किंवा वारसा हक्काने मिळालं आहे हे सिद्ध करावं लागेल.