m cap eight of the top 10 most valued firms of sensex lose
म्हणून रिलायन्ससह ‘त्या’ही कंपन्यांना फटका; M-Cap मध्ये झाली तब्बल १.५७ लाख कोटींची घट

बाजारात झालेल्या घसरणीचा सर्वाधिक परिणाम सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्सवर (Reliance) झाला आहे. या कंपनीच्या एकूण बाजार मूल्यामध्ये ७० हजार १८९ कोटी इतकी घट झाली आहे. देशातील प्रमुख १० कंपन्यांपैकी असलेल्या इन्फोसिस (Infosis) आणि एचसीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies) यांच्याच बाजारमूल्यात फक्त वाढ झाली आहे.

मुंबई : जगभरातील अर्थव्यवस्था (economy) ढासळत असतानाच चौफेर वारू उधळत आपली वेगवान घोडदौड करणाऱ्या शेअर बाजाराला (share market) मागील आठवड्यात फटका बसला. युरोपात (Europe) पुन्हा लॉकडाऊन (lockdown) होण्याच्या बातमीने बाजाराला झटका बसला. त्यामुळे भारतातील (Indian) बड्या कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलमध्ये (M-Cap)  तब्बल १.५७ लाख कोटी रुपयांची घट झालेली आहे.

बाजारात झालेल्या घसरणीचा सर्वाधिक परिणाम सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सवर झाला आहे. या कंपनीच्या एकूण बाजार मूल्यामध्ये ७० हजार १८९ कोटी इतकी घट झाली आहे. देशातील प्रमुख १० कंपन्यांपैकी असलेल्या इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नोलॉजीज यांच्याच बाजारमूल्यात फक्त वाढ झाली आहे. इतर आठ कंपन्यांनी आपली घट नोंदवली आहे. त्यामुळे त्यांचे शेअर असलेल्या इन्व्हेस्टर मंडळींनाही याच फटका बसला आहे.

कंपन्यांच्या बाजारमूल्यात झालेली घट अशी :

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : ७० हजार १८९ कोटी

भारती एयरटेल : ३१ हजार ९६ कोटी

आयसीआयसीआय बँक : १४ हजार ७५२ कोटी

एचडीएफसी : १२ हजार ७३७ कोटी

टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) : १० हजार ६७६ कोटी

एचडीएफसी बँक : ७ हजार २८६ कोटी

कोटक महिंद्रा बँक : ५ हजार ७१० कोटी

हिंदुस्तान युनिलीवर लि. : ४ हजार ८२८ कोटी

कंपन्यांच्या बाजारमूल्यात झालेली वाढ अशी :

HCL टेक्नोलॉजीज : ४ हजार ४५० कोटी

इन्फोसिस : ३ हजार ६२२ कोटी