बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ पण नामांकित कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली घसरण

बुधवारच्या सत्रात मिडकॅप शेअरमध्ये चांगली वाढ झाली. मिडकॅप इंडेक्समध्ये १९६ अंकांची वाढ झाली तर निफ्टी बँक ७३ अंकांनी वधारला. रिलायन्स , कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि आयटीसी या शेअरमध्ये घसरण झाली.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, मुंबई.

    जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे बुधवारी गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला. बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २५४ अंकांनी वधारला आणि ५१२८० अंकांवर स्थिरावला.

    राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७६ अंकांनी वधारला आणि १५१७५ अंकावर बंद झाला. बुधवारच्या सत्रात मिडकॅप शेअरमध्ये चांगली वाढ झाली. मिडकॅप इंडेक्समध्ये १९६ अंकांची वाढ झाली तर निफ्टी बँक ७३ अंकांनी वधारला. रिलायन्स , कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि आयटीसी या शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा आणि निफ्टी मेटल या शेअर निर्देशांकात वाढ झाली.