Maruti, Suzuki जुलैमध्ये मारुतीच्या विक्रीत वाढ

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री जुलै महिन्यामध्ये १.३ टक्क्यांनी वाढली आहे. अडचणीमध्ये सापडलेल्या देशातील वाहन उद्योगासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे.

मुंबई: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री जुलै महिन्यामध्ये १.३ टक्क्यांनी वाढली आहे. अडचणीमध्ये सापडलेल्या देशातील वाहन उद्योगासाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र, देशातील अन्य वाहन उत्पादक कंपन्यांना अद्यापही विक्रीत फटका बसत आहे. मारुती सुझुकीने जुलै महिन्यातील आपल्या देशांतर्गत विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये १.३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. यावर्षी कंपनीने १ लाख १ हजार ३०७ वाहनांची विक्री केली आहे.

मारुतीच्या विक्रीमध्ये वाढ झाली असली तरी अन्य वाहनांच्या विक्रीमध्ये मात्र जुलै महिन्यातही घटच झाली आहे. ह्युंदाई मोटर्स (२ टक्के), महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र (३५ टक्के), टोयोटा किर्लोस्कर मोटर्स (४८.१२ टक्के) या कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. हिरो, सुझुकी आणि रॉयल एन्फिल्ड या मोटारसायकलींच्या विक्रीतही घट झाली आहे. हिरोची विक्री जून महिन्याच्या तुलनेत वाढली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये घटच होत आहे. हिरोने सुमारे ३ हजार वाहने निर्यात केली आहेत.

एमजी मोटर्सचीही वाढ

ब्रिटिश कंपनी असलेल्या एमजी मोटर्सची भारतामधील विक्री ४० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. जुलै महिन्यात या कंपनीने २१०४ वाहने विकली. मागील वर्षाच्या याच महिन्यातील त्यांची विक्री १५०८ वाहनांची होती. लॉकडाऊनमुळे विक्री कमी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.