McDonalds Launches Service for Consumers in Maharashtra with Golden Guarantee of Safety Hygiene and Delicious Foods
मॅकडोनाल्‍ड्सकडून सुरक्षितता, स्‍वच्‍छता व स्‍वादिष्‍ट फूडच्‍या गोल्‍डन गॅरण्‍टीसह महाराष्‍ट्रातील ग्राहकांसाठी सेवेचा शुभारंभ

प्रतिक्षा करणा-यांना चांगल्‍या गोष्‍टी निश्चितच मिळतात आणि तो प्रतिक्षाकाळ अखेर संपला आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान रेस्‍टॉरण्‍ट्स सहा महिने बंद राहिल्‍यानंतर पश्चिम व दक्षिण भारतामध्‍ये मॅकडोनाल्‍ड्स रेस्‍टॉरण्‍ट्सचे मालकीहक्‍क असण्‍यासोबत कार्यसंचालन पाहणारी कंपनी वेस्‍टलाइफ डेव्‍हलपमेंट पुन्‍हा एकदा महाराष्‍ट्रातील ग्राहकांसाठी सेवा सुरू करण्‍यास सज्‍ज आहे.

मुंबई : प्रतिक्षा करणा-यांना चांगल्‍या गोष्‍टी निश्चितच मिळतात आणि तो प्रतिक्षाकाळ अखेर संपला आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊनदरम्‍यान रेस्‍टॉरण्‍ट्स सहा महिने बंद राहिल्‍यानंतर पश्चिम व दक्षिण भारतामध्‍ये मॅकडोनाल्‍ड्स रेस्‍टॉरण्‍ट्सचे मालकीहक्‍क असण्‍यासोबत कार्यसंचालन पाहणारी कंपनी वेस्‍टलाइफ डेव्‍हलपमेंट पुन्‍हा एकदा महाराष्‍ट्रातील ग्राहकांसाठी सेवा सुरू करण्‍यास सज्‍ज आहे. कंपनीने आपले कर्मचारी आणि ग्राहकांना सुरक्षित व आरोग्‍यदायी अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी कोणतीच कसर सोडलेली नाही. कंपनी तिच्‍या गोल्‍डन गॅरण्‍टी व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून डाइन-इन सेवा पुन्‍हा सुरू करत आहे.

पश्चिम व दक्षिण भारतातील मॅकडोनाल्‍ड्सचे हे गोल्‍डन गॅरण्‍टी व्‍यासपीठ कंपनीने त्‍यांच्‍या जागतिक दर्जाच्‍या पद्धतींमध्‍ये भर केलेल्‍या ४२ उच्‍चस्‍तरीय सुरक्षितता व स्‍वच्‍छतासंदर्भातील मुद्यांचे पालन करते. या नवीन प्रक्रिया मोकळ्या हातांनी स्‍पर्श न करता फूड बनवण्‍यासोबत सर्व्‍ह केले जाण्‍याची खात्री देतात. तसेच या प्रक्रिया कॉन्‍टॅक्‍टलेस कार्यसंचालन, वारंवार सॅनिटायझेशन, सोशल डिस्‍टन्सिंग आणि डाइन-इन, डिलिव्‍हरी व टेक-आऊट माध्‍यमांमध्‍ये सर्व आवश्‍यक प्रोटेक्टिव्‍ह गिअर्सच्या वापराची देखील खात्री देतात. यामधून प्रत्‍येक पायरीवर कर्मचारी व ग्राहक सुरक्षित असण्‍याची खात्री मिळते.

६ महिन्‍यांहून अधिक काळानंतर राज्‍यामध्‍ये पुन्‍हा डाइन-इन सुरू होत आहे. आम्‍ही आमच्‍या ग्राहकांसाठी हा अनुभव पूर्णत: सुरक्षित, आरोग्‍यदायी व खास बनवण्‍यासाठी कटिबद्ध आहोत. सध्‍या सुरू असलेल्‍या आरोग्‍यविषयक संकट काळामध्‍ये आम्‍ही आमचे ग्राहक व आमच्‍या कर्मचा-यांच्‍या सुरक्षिततेसाठी जागतिक एसओपींचा अवलंब करण्‍यासोबत नवीन प्रक्रिया तयार केल्‍या आणि सर्व सरकारी नियमांचे पालन केले आहे. आम्‍ही आतापर्यंत आमच्‍यावर विश्‍वास दाखवण्‍यासोबत प्रेमाचा वर्षाव करणा-या आमच्‍या ग्राहकांचे आभार मानतो. आम्‍ही त्‍यांना भविष्‍यात देखील आनंद देत राहण्‍याची आशा करतो.

सौरभ कालरा, मुख्‍य कार्यकारी अधिकारी (पश्चिम व दक्षिण) , मॅकडोनाल्‍ड्स इंडिया

तुम्‍ही डाइन-इनसाठी ज्यावेळी मॅकडोनाल्‍ड्स रेस्‍टॉरण्‍ट्सना भेट द्याल तेव्‍हा तुम्‍हाला अनुभवण्‍यास मिळणा-या नवीन गोष्‍टींबाबतची माहिती:

१) तुम्‍हाला ग्राहक व कर्मचा-यांसाठी अनुक्रमे ऑर्डरिंग काऊंटर्सवर आणि किचनमध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंग मार्किंग्‍ज केलेले दिसतील.

२) प्रवेशद्वारावर सर्व ग्राहक व कर्मचा-यांचे अनिवार्यपणे तापमान तपासण्‍यात येईल.

३) डाइनिंग क्षेत्रामध्‍ये ग्राहकांदरम्‍यान सोशल डिस्‍टन्सिंग असण्‍याच्‍या खात्रीसाठी पर्यायी टेबल व खुर्ची बसण्‍याची व्‍यवस्‍था असेल.

४) कर्मचारी नेहमीच मास्‍क्‍स व ग्‍लोव्‍ह्ज सारखे प्रोटेक्टिव्‍ह गिअर परिधान केलेले दिसतील. मोकळ्या हातांनी स्‍पर्श न करता फूड तयार करण्‍यासोबत सर्व्‍ह करण्‍यात येतील. दर चार तासांनी किचनमधील उपकरणे व टेबल्‍स सॅनिटाईज करण्‍यात येतील.

५) ब्रॅण्‍डने भारतामध्‍ये कार्यसंचालन सुरू केल्‍यापासूनच शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी किचन्‍स, उपकरणे, भांडी व साफसफाईचे कपडे वेगळे ठेवले आहेत. ब्रॅण्‍ड आता आरोग्‍यदायी फूडसोबत सोर्स ट्रॅकिंग आणि नियमितपणे अन्‍न सुरक्षा ऑडिट्सवर अधिक लक्ष देत आहे.

६) डिलिव्‍हरी राइडर्स ऑर्डर गोळा करताना नियुक्‍त केलेल्‍या मार्किंग्‍जवर उभे राहिलेले दिसतील. टेकअवे ऑर्डर्स घेण्‍यासाठी आलेल्‍या ग्राहकांसाठी मार्किंग्‍जसह विशेष लाइन आखलेली दिसेल.

७) रेस्‍टॉरण्‍ट लीडरशीप टीमला एफएसएसएआयद्वारे आयोजित आरोग्‍य व स्‍वच्‍छता मॉड्युल्‍समध्‍ये उत्तमरित्‍या प्रशिक्षण देण्‍यात येईल आणि नवीन टीम सदस्‍याला कोविड-१९ विरोधातील खबरदारीच्‍या उपायांसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्‍यात आलेले असेल.

८) फक्‍त एवढेच नाही! मॅकडोनाल्‍ड्स अन्‍न सुरक्षा व्‍यवस्‍थापन प्रक्रियेची सखोलपणे काळजी घेण्‍यात येण्‍यासाठी त्‍यांच्‍या पुरवठादारांसंदर्भात देखील सुरक्षितता व स्‍वच्‍छता पद्धतींची तपासणी करेल.

९) पूर्णत: कॉन्‍टॅक्‍ट-लेस डाइन-इन अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी मॅकडोनाल्‍ड्सने व्‍हॉट्सॲपच्‍या माध्‍यमातून पाठवलेल्‍या डिजीटल मेनूंमधून कॉन्‍टॅक्‍टलेस ऑर्डरिंग आणि यूपीआय किंवा टॅप एन पेच्‍या माध्‍यमातून कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेण्‍ट्सची देखील सुविधा दिली आहे.

१०) या गोल्‍डन गॅरण्‍टीसह तुम्ही कुटुंब व मित्रांसोबत स्‍पेशल डिनरसाठी मॅकडोनाल्‍ड्सला भेट द्याल तेव्‍हा उत्तम सुरक्षिततेची खात्री मिळू शकते. आता तुमच्‍या सवडीप्रमाणे मॅकडोनाल्‍ड्सचा आनंद घ्‍या!