MG Motor ने भारतात ‘एमजी रिअशुअर’ प्री-लव्ह्ड कार युनिट लाँच केले

ग्राहकांचा विश्वास आणि मालकी अनुभव अधिक दृढ होण्यासाठी एमजी मोटर इंडियाने भारतात ‘एमजी रिअशुअर’या प्रमाणित प्री-लव्ह्ड कार व्हर्टिकलची सुरुवात केली.

मुंबई : ग्राहकांचा विश्वास आणि मालकी अनुभव अधिक दृढ होण्यासाठी MG Motor Indiaने भारतात ‘एमजी रिअशुअर’या प्रमाणित pre-loved car व्हर्टिकलची सुरुवात केली. एमजीच्या ग्राहकांना डिलरशिपवर एमजी कारसाठी तत्काळ आणि सर्वोत्कृष्ट अवशिष्ट मूल्य प्रदान करणे, हे एमजीचे उद्दिष्ट आहे. प्री-लव्ह्ड वाहनांचे मूल्यांकन १६० पेक्षा जास्त क्वालिटी चेक्सद्वारे केले जाईल. जेणेकरून अग्रगण्य तपासणी मानकांची खात्री होईल आणि पुनर्विक्रीपूर्वी सर्व आवश्यक दुरूस्ती केली जाईल.

तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सातत्याने केल्या जाणा-या प्रयत्नांचा भाग म्हणून, वापरलेल्या वाहनांच्या किंमतीसाठी एमजी रितसर मूल्यांकन करेल. एमजीचे मालक त्यांच्या एमजी कार कोणत्याही बंधनाशिवाय विक्री करू शकतात आणि नव्या एमजी वाहनाच्या बदल्यात एक्सचेंजही करू शकतात.

एमजी मोटर इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी श्री गौरव गुप्ता म्हणाले, एमजी रिअशुअर प्रोग्रामद्वारे, भारतातील सर्व एमजी ग्राहकांसाठी पारदर्शकता, वेग, मनाची शांतता वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करणे, हा आमचा उद्देश आहे. तसेच एमजी कारच्या सर्वोत्कृष्ट पुनर्विक्री मूल्याची खात्री यातून दिली जाईल. आमच्या रिअशुअर केंद्रांतून दर्जेदार प्री-लव्ह्ड एमजी कार खरेदी करण्याची संधी इतर ग्राहकांनाही दिली जाईल. या उपक्रमामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल. तसेच एमजी कुटुंबात राहताना, लवचिक मालकीचा आनंद घेत आमचे ग्राहक सामर्थ्यही वाढेल.”

एमजी वाहनांनी पूर्वीपासूनच या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पुनर्विक्री मूल्य राखले आहे. शीर्ष कार मूल्यांकन इंजिन्सच्या मते, एमजी हेक्टरची पुनर्विक्री मूल्य हे त्या गटात वर्चस्व गाजवत आहे. उद्योग क्षेत्रातील अहवालांनुसार, एमजी हेक्टर १ वर्ष वापरल्यानंतर तिचे सध्याचे अवशिष्ट मूल्य ९५ ते १०० टक्क्यांच्या श्रेणीत जाते. हा स्वत:च एक बेंचमार्क आहे. ग्राहक केंद्रीत दृष्टीकोनामुळे तसेच ग्राहकांच्या समाधानासाठी उद्योगातील प्रथम पुढाकारानेही हे शक्य झाले आहे.