michael jordan jersey barack obama wore 41 years ago in school sells for 1 4 crore rupees
माजी राष्ट्रपती ओबामा (Barack Obama) यांची शाळेतली Jersey 'किती कोटीं'ना विकली गेली माहितीये, झाला विश्वविक्रम

पाच वेळा एनबीए मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आणि १४ वेळा एनबीए ऑल-स्टार प्लेमेकर यांनी घातलेल्या कोणत्याही जर्सीसाठी ही रेकॉर्ड ब्रेक बोली ठरली आहे. ही सफेद जर्सी जॉर्डन यांनी आपल्या पहिल्या मॅचमध्ये बुल्स क्लबचे सदस्य असताना घातली होती. जॉर्डनच्या जर्सीसाठीही रेकॉर्ड ब्रेक बोली लावण्यात आली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी १९७९ साली हवाईच्या पुनाहौ शाळेत बास्केटबॉल मॅच खेळताना घातलेली जर्सी लिलावात १९२,००० डॉलर म्हणजेच १ कोटी ४० लाख रुपयांना विकली गेली आहे. लिलावात विकल्या गेलेल्या माध्यमिक शाळेतल्या जर्सीसाठी लावण्यात आलेली ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. या सुंदर सफेद जर्सीचा नंबर आहे २३.

सेवानिवृत्त एनबीएचे दिग्गज मायकल जॉर्डन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी एनएफएल क्वार्टरबॅक कॉलिन कॅपरनिक यांनी घातलेल्या जर्सीने शुक्रवारी झालेल्या लिलावात विश्वविक्रमाची नोंद केली. शुक्रवारी संपलेल्या चार दिवसांच्या या लिलावात एनबीए लॉस एंजलिस लेकर्स स्टार लेब्रोन जेम्स यांच्याही जर्सीचा समावेश होता. एनबीए अमेरिकेत बास्केट बॉल मॅच आणि सीरिज आयोजित करणारी सर्वात मोठी संस्था आहे.

पाच वेळा एनबीए मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर आणि १४ वेळा एनबीए ऑल-स्टार प्लेमेकर यांनी घातलेल्या कोणत्याही जर्सीसाठी ही रेकॉर्ड ब्रेक बोली ठरली आहे. ही सफेद जर्सी जॉर्डन यांनी आपल्या पहिल्या मॅचमध्ये बुल्स क्लबचे सदस्य असताना घातली होती. जॉर्डनच्या जर्सीसाठीही रेकॉर्ड ब्रेक बोली लावण्यात आली होती.

१८ जुलैला इंडियाना विरूद्ध १९९८ च्या एका मॅचमध्ये घातलेल्या या जर्सीचा २८८,००० डॉलर्समध्ये लिलाव झाला होता.
ओबामा यांच्या २३ नंबरच्या सफेद जर्सीचा १९२,००० डॉलरमध्ये लिलाव झाला आहे. माजी राष्ट्राध्यक्षांनी ही जर्सी १९७९ साली पुनाहौ शाळेच्या हवाई राज्याविरोधात एका चॅम्पियन सामन्यात टीममधील खेळाडू म्हणून ती घातली होती, कोणत्याही शाळेच्या जर्सीसाठी ही रेकॉर्डब्रेक किंमत आहे.

अन्य वस्तू आणि जिंकणाऱ्या बोलींमध्ये कोबे ब्रायंट यांच्याकडून साइन्ड एनबीए फायनल जर्सीचा ३८, ४०० डॉलर्समध्ये लिलाव झाला. १९५८ च्या फीफा विश्वचषकात एक जबाबदार टीमचा संघनायक (कॅप्टन) आर्मबँड के यांना १०,२४० डॉलरमध्ये विकली गेली.