युवाच्या आर्ट अँड क्राफ्ट उत्पादनांच्या श्रेणीमध्ये आता युवा कॅनव्हास हे नवे उत्पादन दाखल
युवाच्या आर्ट अँड क्राफ्ट उत्पादनांच्या श्रेणीमध्ये आता युवा कॅनव्हास हे नवे उत्पादन दाखल

मुंबई : नवनीत (Navneet ) चा स्थानिक स्टेशनरी ब्रँड युवा (Youva) ने आपल्या आर्ट अँड क्राफ्ट (art & craft) उत्पादनश्रेणीमध्ये ‘युवा कॅनव्हास’ (Youva canvas) हे नवे उत्पादन दाखल केले आहे. सध्या लॉकडाऊनच्या (lockdown) परिस्थितीमध्ये अनेक मुले तसेच विद्यार्थी आपल्या सर्जनशील कौशल्यांची जोपासना करत आहेत. त्यामुळे या श्रेणीमध्ये कॅनव्हास हे एक लोकप्रिय उत्पादन बनले आहे यात शंका नाही. युवा कॅनव्हास बोर्डससाठी वापरल्या गेलेल्या अस्सल सामग्रीमुळे हे कॅनव्हास अशाच प्रकारच्या इतर उत्पादनांहून सरस ठरले आहे व म्हणूनच विद्यार्थी तसेच व्यावसायिक चित्रकार आणि कलाकारांना ते अधिक सोयीचे ठरत आहेत. हे उत्पादन सध्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथे उपलब्ध असून त्याची उपलब्धता देशभरात विस्तारण्याची कंपनीची योजना आहे.

युवा कॅनव्हासची काही अनोखी वैशिष्ट्ये आहेत. जसे की, हे कॅनव्हास ॲसिड फ्री (acid free) असल्यामुळे रंग पसरत नाहीत व हा कॅनव्हास चित्राचे खरेखुरे रंग दीर्घकाळासाठी जसेच्या तसे पकडून ठेवतो, त्यावरीलॲक्रेलिक गेसो प्रायमरचा तिहेरी लेप त्याचा पांढरेपणा खूपच दाट करतो, गेसो प्रायमरमुळे कॅनव्हासवर रंग अधिक चांगल्या प्रकारे चिकटतात, योग्य प्रकारे शोषले जातात तसेच अधिक चमकदार बनतात, युवा कॅनव्हाससाठी वापरलेले वजनाला हलके नॉन-बेंडिंग बोर्डस्हाताळायला सुलभ आणि हलके आहेत, कॅनव्हास चिकटविण्यासाठी वापरलेल्या अँटी-फंगल ग्लू मुळे या बोर्डसवरचे चित्र सुरक्षित राहते आणि त्यांचे आयुर्मान वाढते, मीडिअम ग्रेन कॉटन कॅनव्हासचा वापर हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अशा सर्व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनी सुसज्ज असे युवा मीडिअम ग्रेन प्राइम्ड कॉटन कॅनव्हास पॅनल्स चित्रकलेच्या क्षेत्रातील नवख्यांसाठी तसेच चित्रकारांसाठीही आदर्श आहेत व त्यांच्यावर पोस्टर कलर्सनी चित्र काढता येते. हे बोर्ड्स ८x१०, १०x१२, १२x१६, १४x१८आणि१६x२०अशा पाच वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध आहेत.

''मुले, तरुण आणि व्यावसायिक अशा सर्व गटांतील कलाकारांना त्यांच्यातील सर्जनतेला खुलवेल असा कॅनव्हास हवा असतो. अनेक मोलाच्या वैशिष्ट्यांचा समावेश असलेले हे उत्पादन ते वापरणा-याग्राहकवर्गाकडून चांगल्या प्रकारे स्वीकारले जाईल याची आम्हाला खात्री आहे. अशाचप्रकारे अधिकाधिक दर्जेदार व किंमतीचा पुरेपूर मोबदला देणारी उत्पादने आम्ही यापुढेही बनवत राहू.''

अभिजीत सन्याल, चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि प्रवक्ते, युवा