आनंदाची बातमी! गृहकर्ज घ्यायचंय आणि तेही स्वस्तात, पण पर्याय सापडत नाहीये तर हा पर्याय झालाय उपलब्ध; जाणून घ्या सविस्तर

ज्या भागात बँकिंग सुविधा (Banking Fcilities) पोहोचलेल्या नाहीत अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत, अशा भागात स्वस्त गृहकर्जाची सुविधा (cheap home loan facility) या भागीदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे. विमा कंपन्यांसोबत (Insurance companies) काम करण्याची आयपीपीबीची ही काही पहिलीच वेळ नाही.

    नवी दिल्ली : गृहकर्ज घ्यायचंय पण स्वस्तात मिळत नाहीये. यासाठी आता तुम्हाला बँकेत जाण्याची गरजच उरणार नाही. जवळच्याच पोस्ट ऑफिसातूनही तुम्ही स्वस्त गृहकर्जाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तेथून तुम्ही कर्ज घेऊ शकाल आणि तेही स्वस्तात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) एलआयसी हाऊसिंग फायनान्ससोबत (LIC HFL) भागीदारी (Partnership) केली असून, आयपीपीबीच्या ४.५ कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा (Home Loan Facility) उपलब्ध होईल.

    सूत्रांनी सांगितले की, आयपीपीबीच्या देशभरात ६५० शाखा असून, १,३६,००० बँकिंग पोहोच केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून आयपीपीबी वेतनधारी नोकरदारांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकेल. या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर अवघा ६.६६ टक्के असेल.

    या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भागात बँकिंग सुविधा पोहोचलेल्या नाहीत अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत, अशा भागात स्वस्त गृहकर्जाची सुविधा या भागीदारीच्या माध्यमातून आयपीपीबी पोहोचवणार आहे. विमा कंपन्यांसोबत काम करण्याची आयपीपीबीची ही काही पहिलीच वेळ नाही.

    दोन लाख कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क

    दोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी करून या भागीदारीची माहिती दिली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आयपीपीबीकडे २ लाख डाक कर्मचाऱ्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्रामीण भागातही हे नेटवर्क काम करते. हेच कर्मचारी गृहकर्जाच्या वितरणात महत्त्वाची भूमिका निभावतील.