होळीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी- सोने,चांदीच्या दरात घसरण

होळी (holi)सणाच्या तोंडावर सोने-चांदीच्या दरात(gold and silver prize today) पुन्हा घसरण झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवरील (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १५९ रुपयांनी घसरून ४४,७०१रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा दर ३४५ रुपयांनी घसरून ६४,९०० रुपये प्रतिकिलोवर आला.

    दिल्ली: होळी (holi)सणाच्या तोंडावर सोने-चांदीच्या दरात(gold and silver prize today) पुन्हा घसरण झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवरील (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १५९ रुपयांनी घसरून ४४,७०१रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा दर ३४५ रुपयांनी घसरून ६४,९०० रुपये प्रतिकिलोवर आला.

    या घसरणीनंतर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ४३, ९२० रुपये आणि २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ४४, ९२० रुपयांवर आले आहे. यापूर्वी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात ४४ रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीची किंमतही सुमारे ६३७ रुपयांनी घसरून ६४११० रुपयांवर पोहोचले होते.

    चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये (एप्रिल-फेब्रुवारी) सोन्याची आयात ३.३ टक्क्यांनी घसरली. ती २६.११ अब्ज डॉलरवर गेली. सोन्याच्या आयातीतील कपातीमुळे देशातील व्यापार तूट कमी होण्यास मदत झाल्याचे तज्ञांचे मत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत व्यापार तूट८४.६२ अब्ज डॉलर्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत १५१.३७ अब्ज डॉलर्स होती.