पॅनासोनिकचे मनमोहक ‘Ziva’ Modular Swiches बाजारात दाखल

नव्या जीवनशैलीचा स्वीकार करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना समोर ठेऊन कंपनीने झिवा या परवडणाऱ्या मॉड्युलर स्विचची मनमोहक श्रेणी बाजारात सादर केली आहे.

मुंबई : इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन मटेरियल्सची (ईसीएम) निर्मिती करणारी पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडिया ही भारतातील सर्वांत मोठ्या उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. नव्या जीवनशैलीचा स्वीकार करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना समोर ठेऊन कंपनीने झिवा या परवडणाऱ्या मॉड्युलर स्विचची मनमोहक श्रेणी बाजारात सादर केली आहे. कंपनीने सादर केलेल्या या नव्या श्रेणीतून त्या ब्रँडची बाजारपेठेतील पकड दिसून येते आणि तो या क्षेत्रात आणखी विस्तारत असल्याचेही दिसते. ज्या ग्राहकांना अप्रतिम दर्जाचे तरीही परवडणाऱ्या किंमतीतील स्विच हवे आहेत अशांसाठी झिवा ही या प्रकारातील आगळीवेगळी श्रेणी आहे.

सध्याच्या उत्कृष्ट पोर्टफोलिओमध्ये भर घालताना झिवा स्विचेस म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान, सर्वाधिक उपयोगिता आणि देखणे डिझाइन यांचा सुरेख संगम आहे. आपले घर उच्च अभिरुची संपन्न दिसावे त्यासाठी त्या श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने आपण वापरावीत अशा मानसिकतेतील सध्याच्या ग्राहकांसाठी ही श्रेणी तयार केली आहे. पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडियाने तयार केलेली झिवा ही श्रेणी संपूर्णपणे भारतात विकसित व डिझाइन केली असून, यामध्ये स्टायलिश आणि वेगळी साधने उपलब्ध आहेत, ज्यामध्ये स्विच, सॉकेट, अ‍ॅक्सेसरीज (पंख्याचे रेग्युलेटर), टेलिफोन सॉकेट, रिसेप्टर, टीव्ही सॉकेट आणि युएसबी चार्जर यांचा समावेश आहे. स्लिम आणि नाजूक डिझाइन, या दर्जाच्या साधनांमध्ये सर्वोत्तम सुरक्षित फीचर्स, त्याचबरोबर दीर्घकाळ काम करणे अशा विविध वैशिष्ट्यांनी या श्रेणीतील साधने सजली आहेत. तसेच ही साधने केवळ दिसायलाच उत्तम आहेत असे नाही तर ती टिकाऊ पण आहेत. त्यामुळे एका छताखाली परवडणारी साधने उपलब्ध करून देणारी ‘वन स्टॉप शॉप’ असे या श्रेणीला म्हटले जाते.

यावेळी पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विवेक शर्मा म्हणाले, ‘’एक ‘परिपूर्ण’ उत्पादनांचा पोर्टफोलिओ तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये झिवा या श्रेणीचे सादरीकरण हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. श्रेणी ३, ४ आणि ५ बाजारपेठांतील वाढती मागणी पुरवून या लहान आणि आम्ही न पोहोचलेल्या बाजारपेठांमध्ये आमचे अस्तित्व निर्माण करणे व विस्तार करणे हा श्रेणी दाखल करण्यामागचा उद्देश आहे. या महामारीने व्यवसायांना रोखले होते पण तरीही ही श्रेणी बाजारात आणून आम्ही पुन्हा व्यवसाय वृद्धीचा प्रवास सुरू करत आहोत आणि देशभरातील वेगाने पूर्वपदावर येणाऱ्या आर्थिक हालचालींना बळ देत आहोत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

‘प्रधानमंत्री आवास योजना’ या योजनेला पाठिंबा देण्यासाठी झिवा ही श्रेणी तयार केली असून ‘आत्मनिर्भर भारत अभियानाचा’ भाग म्हणून आम्ही भारतातील उत्पादन क्षमता वाढवणार आहोत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट आणि कंत्राटदार यांना नव्या पिढीतील साधने वापरण्याचा पहिलावहिला अनुभव मिळेल व आमचे त्यांच्यासोबतचे संबंध वृद्धिंगत होतील. प्राथमिक आणि किफायतशीर अशा मॉड्युलर क्षेत्रातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही त्यांना उच्च दर्जाची परवडणारी उत्पादने देण्यासाठी वचनबद्ध आहोत.’’