Paytms partnership with Suryodaya Small Finance Bank to enable MSMEs with instant digital loans

व्यापारी बँकेबरोबर व्यवहार करू शकतील आणि फोनवर फक्त टॅपने कर्ज घेऊ शकतील. अर्ज करण्यापासून मंजुरीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पेटीएम अ‍ॅपवरच पूर्ण होणार असल्याने व्यापाऱ्यांना बँकेच्या शाखेला भेट देण्याची गरज नाही.

मुंबई : इन्स्टंट डिजीटल कर्जासह एमएसएमईंना सक्षम करण्यासाठी भारताच्या घरगुती डिजिटल डिजिटल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएमने आज सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेबरोबर भागीदारीची घोषणा केली. पारंपारिक बँकिंग प्लेयर्सकडून वित्तीय सेवा मिळविण्यास असमर्थ असणाऱ्या व्यवसायांना इन्स्टंट मायक्रोलोन्स ऑफर देऊन ही कंपनी आर्थिक समावेशाच्या आपल्या प्रयत्नांना गती देत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून कंपनीने पुढील १२ ते १८महिन्यांमध्ये १ लाखाहून अधिक लहान व्यवसायांना कर्ज वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

व्यापाऱ्यांना अखंडपणे कर्ज मिळवून देण्यात मदत करण्यासाठी लहान वित्त बँकेसह पेटीएमने केलेली ही पहिली भागीदारी आहे.
पेटीएमनेकर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल व त्रास-मुक्त केली आहे जेणेकरुन व्यापारी बँकेबरोबर व्यवहार करू शकतील आणि फोनवर फक्त टॅपने कर्ज घेऊ शकतील. अर्ज करण्यापासून मंजुरीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पेटीएम अ‍ॅपवरच पूर्ण होणार असल्याने व्यापाऱ्यांना बँकेच्या शाखेला भेट देण्याची गरज नाही.

कंपनीने म्हटले आहे की, बँकेच्या मान्यता प्राप्त पतधोरणानुसार अंडररायटिंग काही सेकंदातच केली जाईल आणि मंजुरीनंतर सूर्योदय मार्फत ग्राहकांना वितरित केले जातील. ही प्रणाली रिअल-टाइम मंजुरीसाठी डिझाईन करण्यात आली आहे जेणेकरून ग्राहकांना श्रेष्ठ अनुभवाची हमी मिळेल.

कर्ज घेण्यासाठी व्यापाऱ्यांना पेटीएम फॉर बिझिनेस अ‍ॅपवर लॉगइन करावे लागेल, कर्जाची ऑफर निवडावी लागेल आणि बँकेच्या अगदी छोट्या आणि सोप्या प्रक्रियेमधून जावे लागेल. प्रक्रियापूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट त्यांच्या बँकखात्यात वितरित केली जाईल.